Farhan Akhtar And Shibani Dandekar : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच शिबानीने तिच्या हातावर एक टॅटू काढला आहे. शिबानीने तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर 3 उडणाऱ्या पक्ष्यांचा टॅटू काढला आहे. फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आता त्यांच्या लग्नसोहळ्याची प्रतीक्षा करत आहेत. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत  कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर त्यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे.





लग्नासाठी पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले आहे. फरहान अख्तर लवकरच 'जी ले जरा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या


किरण मानेंचे आरोप बिनबुडाचे, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यानं मालिकेतून काढलं, स्टार प्रवाहचं स्पष्टीकरण


Unpaused Naya Safar : नागराज मंजुळे नव्या रुपात प्रेक्षकांसमोर! वेबसिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha