Siddharth Jadhav Viral Video on Indigo :  अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा त्याच्या चित्रपटांमुळे, त्याच्या कामामुळे कायमच चर्चेत असतो. पण सध्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर (Social Media) सिद्धार्थची जोरदार चर्चा सुरु आहे. सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करुन इंडिगो (Indigo) या विमान कंपनीच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. कारण इंडिगो कंपनीसोबत सिद्धार्थच्या सामानाची व्यवस्थित केअर न केल्याने सिद्धार्थ भडकला असल्याचं या व्हिडिओमधून समोर आलं आहे. 


दरम्यान त्याच्या या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी देखील कमेंट्स करत सिद्धार्थसोबत घडलेल्या या प्रसंगाचा निषेध केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. पण सिद्धार्थसोबत नेमकं काय घडलं? सिद्धार्थचा राग इतका का अनावर का याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


म्हणून सिद्धार्थ इंडिगोवर भडकला


अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यानं म्हटलं की, हाय नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही स्वत:च बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवलंय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं.” सिद्धार्थने या व्हिडिओमध्ये एक रागाचा इमोजी देखील अॅड केलाय. तसेच त्याने इंडिगो कंपनीला देखील टॅग केलंय. 






सिद्धार्थच्या बॅग दुरावस्था


या प्रवासादरम्यान सिद्धार्थची बॅग तुटली. त्यामुळे सिद्धार्थने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सेवेवरच राग व्यक्त केला आहे. त्यामुळे यावर आता इंडिगो कंपनीकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दी असो किंवा मराठी सिनेसृष्टी असो सिद्धार्थने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिद्धार्थ मुंबई गोवा प्रवास करताना इंडिगो कंपनीसोबत त्याला हा वाईट अनुभव आल्याचं त्याच्या व्हिडिओमधून स्पष्ट झालं आहे. तसेच याबद्दल त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य त्या भावना देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. 


ही बातमी वाचा : 


Vidyadhar Joshi :  ब्रश केल्यानंतर दम लागायचा, तीन पावलं चालल्यानंतर कोसळलो; जीवघेण्या आजारावर विद्याधर जोशींनी केली मात