Shweta Menon : साऊथ सिनेमात बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेल्या एका अभिनेत्रीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीवर पैशांच्या हव्यासापोटी अश्लील चित्रपट व जाहिरातींमध्ये काम केल्याचा आरोप आहे. या अभिनेत्रीने सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख सोबत देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, मलयाळम अभिनेत्री श्वेता मेनन आहे. तिने जवळपास 30 हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अजय देवगण आणि आमिर खानच्या इश्क चित्रपटातील “हमको तुमसे प्यार है” या गाण्यात तिने आयटम साँग केलं होतं. हे गाणं तेव्हा प्रचंड गाजलं होतं.

Continues below advertisement

श्वेता मेनबाबत बुधवारी  मोठी बातमी समोर आली. रिपोर्टनुसार, कोच्चीतील एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फायद्यासाठी अश्लील चित्रपट व जाहिरातीत काम केल्याचा तिच्यावर आरोप आहे. मात्र या आरोपांवर किंवा एफआयआरबाबत अद्याप श्वेता मेनन यांचं कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.

ही एफआयआर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 67A नुसार दाखल करण्यात आली आहे. आरोपानुसार, श्वेता मेननने काही चित्रपटांतील दृश्यांमध्ये अश्लीलता दाखवली असून नियमांचं उल्लंघन केलं. या चित्रपटांमध्ये पलेरी मणिक्यम आणि रत्ननिर्वेदन यांचा समावेश आहे. याशिवाय एका कंडोम ब्रँडच्या जाहिरातीचाही यात समावेश आहे. हे सीन सोशल मीडिया, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि प्रौढांसाठीच्या वेबसाइट्सवरही उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं.

Continues below advertisement

श्वेता मेननचा जन्म 23 एप्रिल 1974 रोजी झाला. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर अभिनेत्री व टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं. मॉडेलिंग क्षेत्रात तिने मोठं यश मिळवलं. एवढंच नव्हे तर 1994 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिक हा किताबही तिने जिंकला होता. त्यानंतर ती अभिनयाकडे वळली. तिने साऊथसोबत हिंदी सिनेसृष्टीतही खूप काम केलं. तिला केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड आणि फिल्मफेअर अवॉर्ड अशा नामांकित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.

1997 मध्ये आलेल्या इश्क चित्रपटातील श्वेता मेननच्या गाण्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ती यात पांढऱ्या ड्रेसमध्ये आमिर खान व अजय देवगणच्या समवेत आयटम नंबर करताना दिसली होती. “हमको तुमसे प्यार है” हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. तिने याशिवाय शाहरुख खानचा अशोका आणि सलमान खानचा बंधन या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. एकूण 30 हिंदी चित्रपटांमध्ये ती विविध मोठ्या स्टार्ससोबत झळकली आहे. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर श्वेता मेननने आधी बॉबी भोसले यांच्याशी लग्न केलं होतं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2011 मध्ये श्रीवल्सन मेनन यांच्याशी तिने दुसरं लग्न केलं. सध्या तिला एक मुलगी आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मॉडेलसमोर रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून, कॅबसाठी वाट पाहताना प्रताप, अभिनेत्रीची तात्काळ पोलिसात धाव