Gurugram Crime : गुरुग्राममधून एक अत्यंत लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. मॉडेल असलेल्या तरुणीसमोर तरुणाने रस्त्यावर हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आलाय. मॉडेल कॅबसाठी वाट पाहात असताना तिच्यासमोर तरुणाने अश्लील वर्तन आहे. या तरुणीने हे संपूर्ण प्रकरण आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट करून पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे. ही घटना गुरुग्राममधील सर्वात वर्दळीच्या राजीव चौक परिसरात घडली. कॅबची वाट पाहत असलेल्या मॉडेलकडे पाहून एका तरुणाने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या तरुणीने हे दुर्लक्षित केलं, पण जेव्हा त्याचं वर्तन अती होत गेलं, तेव्हा तिने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या तरुणाविरोधात पोलिसांत कारवाईची मागणी केली.

खरंतर ती तरुणी एका कामासाठी गुरुग्रामहून जयपूरला गेली होती. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास ती बसने दिल्ली-जयपूर हायवेवरील राजीव चौक, गुरुग्राम येथे पोहोचली. तिथून ती घराकडे जाण्यासाठी कॅबची वाट पाहत होती. त्याच दरम्यान तिने एका तरुणाला तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करताना पाहिलं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्याचं वर्तन खूप घाणेरडं झालं, तेव्हा तिला त्याचा व्हिडिओ काढावा लागला. त्या तरुणाने चेहऱ्यावर मास्क घातलेला होता. त्याने खांद्यावरून पुढे लटकवलेली बॅग घेतली होती आणि पँटची चैन उघडून तिच्यासमोर अश्लील चाळे करत होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये ती तरुणी म्हणते की, तो तरुण तिच्या आजूबाजूला बऱ्याच वेळेपासून घुटमळत होता. हे पाहून तिचा प्रचंड राग आला असल्याचं तरुणीने पोस्टमध्ये म्हटलंय. तिने अनेक वेळा कॅब ड्रायव्हरला कॉल केला पण त्याने फोन उचलला नाही. त्या घाणेरड्या वागणुकीपासून बचाव करण्यासाठी तिने दुसरी कॅब बुक केली आणि तिथून घरी निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिने तो व्हिडिओ गुरुग्राम पोलीस, सरकारी खात्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि महिला हेल्पलाइनच्या X (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर शेअर केला. मात्र, कुठूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने महिला हेल्पलाइन क्रमांक 1090 वर सुद्धा कॉल केला, पण कॉल कनेक्ट झाला नाही.

ऑनलाईन तक्रार घेतली नाही, मॉडेलने व्यक्त केला संताप 

जेव्हा तिने पोलिसांत तक्रार नोंदवली, तेव्हा तिने सांगितलं की सकाळी 11 वाजता राजीव चौक येथे तिच्यासोबत ही घटना घडली आहे आणि त्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पण ऑनलाईन तक्रार घेण्याऐवजी तिला सांगण्यात आलं की तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. या प्रकरणी तिने सोशल मीडियावर लिहिलं की तिच्यासोबत मोठा अनर्थ घडला असता, तर काय झालं असतं? तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जायचं का? अशा प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन का नोंदवता येत नाहीत? तिने म्हटलं की गुरुग्राम पोलीस ऑनलाईन तक्रारी घेत नाहीत, हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं.या प्रकरणावर पोलीस संदीप कुमार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आली असून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, आता अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा, म्हणाली...