Marathi Actor : अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण बॉलीवूड आता बंद राहिल. राजकीय नेत्यांपासून जगभरातले उद्योगपती या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. त्यातच आता एका मराठी अभिनेत्याला देखील या सोहळ्याचं आमंत्रण आलं आहे. 

Continues below advertisement


अभिनेता श्रेयस राजे याने अंबानींकडून आलेल्या पत्रिकेचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर श्रेयसला पत्रिका देण्यासाठी अंबानींच्य मॅनेजमेंटमधील एक व्यक्ती ही वांद्र्याहून थेट घोडबंदर रोडला पोहचला. त्यामुळे आता श्रेयसही या लग्नाला हजर राहणार आहे. श्रेयसने आतापर्यंत अनेक नाटकं, मालिका, वेब सिरिजमधून काम केली आहेत. सध्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चारचौघी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


श्रेयसने शेअर केली पत्रिका


श्रेयसने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, आता लग्नाला जावं लागेल. पुढे त्याने म्हटलं की, तर ही दस्तुरखुद्द मुकेश अंबानी ह्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉईंट केला होता. जो वांद्र्याहून घोडबपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला.






कसा असेल अनंत-राधिकाचा लग्नसोहळा? (Anant Ambani Radhika Merchant Wedding Update)


अनंत-राधिका यांचा लग्नसोहळा 12 ते 14 जुलैदरम्यान पार पडणार आहे. 12 जुलैला शुभविवाह पार पडेल. 12 जुलैला शुभा आशिर्वाद (Shubh Ashirwad) आणि 14 जुलैला मंगल उत्सव (Mangal Utsav) पार पडणार आहे. 12 जुलैसाठी पारंपारिक ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. तर 13 जुलैला इंडियन फॉर्मल असा ड्रेसकोड आहे. त्यानंतर 14 जुलैला भारतीय पेहराव ठेवण्यात आला आहे.  


अंबानींच्या सोहळ्यला दिग्गजांची हजेरी 


दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी आतापर्यंत जितके सोहळे पार पडले त्या सोहळ्यांना बॉलीवूडसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. नुकत्याच पार पडलेल्या हळदी समारंभातही अनेकजण उपस्थित होते. त्यामुळे सध्या जगभरात या सोहळ्याची बरीच चर्चा सुरु आहे.                                   


ही बातमी वाचा : 


Javed Akhtar : 'पाकिस्तान बनवण्यात तुमच्या वडिलांचं योगदान,' धर्माच्या मुद्द्यावरुन जावेद अख्तरांचं सोशल मीडियावर ट्रोलिंग;संतप्त होत म्हणाले...