Bollywood Drug Case: गेल्या काही दिवसांपासून एक ड्रग सिंडिकेट (Drug Case) प्रकरण बॉलिवूडमध्ये (Bollywood News) चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स धाडण्यात आलं आहे. अशातच आता या प्रकरणी शक्ती कपूर यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरच्या (Siddhant Kapoor) अडचणी वाढल्याचं दिसतंय. सिद्धांत कपूरलाही या प्रकरणी चौकशीसाठी समन्स धाडण्यात आलेलं. सिद्धांत कपूर आज चौकशीसाठी घाटकोपरच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षात दाखल झाला आहे.                                   

Continues below advertisement


अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर यूनिटनं सिधांत कपूरला हजर होण्याच समन्स बजावलं होतं. तर याच प्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला देखील मुंबई पोलिसांनी बुधवारी हजर राहण्याच समन्स बजावलं आहे. दुबईवरून प्रत्यार्पण करण्यात आलेला ड्रग्स सप्लायर मोहम्मद सलीम सोहेल शेख उर्फ लॅविशच्या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आल्यानंतर सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांनी समन्स करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील पहिला अभिनेता आज जबाब नोंदवण्यासाठी दाखल झालेला.                                                    






PTI च्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका उत्पादन युनिटमधून सुमारे 252 कोटी किमतीच्या मेफेड्रोन (MD) जप्त करण्यावर तपास केंद्रीत आहे. चौकशीदरम्यान, मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख यानं दावा केलाय की, भारतात आणि परदेशात भव्य ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या, ज्यात सेलिब्रिटी, मॉडेल, रॅपर, चित्रपट निर्माते आणि अगदी अंडरवर्ल्ड व्यक्ती दाऊद इब्राहिमशी संबंधित लोक उपस्थित होते.


सिद्धांतला चौकशीसाठी का बोलावलं?


मुंबई पोलिसांनी तपासलेल्या कागदपत्रांवरून सिद्धांत कपूरचं नाव या हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये उपस्थित असलेल्यांमध्ये आढळून आलंय. एएनसीनं यावर भर दिला आहे की, नावं नमूद केली असली तरी, त्याला चौकशीसाठी बोलावणं म्हणजे, तो दोषी आहे, असं नाही. त्यामुळे सध्या सिद्धांत कपूरला केवळ जबाब नोंदवण्यासाठी समन्स धाडण्यात आलेलं.