ब्युटी विथ ब्रेन! वेळप्रसंगी मुलांचं ट्युशन घेतलं, पण स्वप्न पूर्ण केलंच, परदेश सोडून आलेल्या IPS अधिकारी पूजा यादव कोण आहेत?
देशात असे अनेक आयपीएस-आयएएस अधिकारी आहेत जे गरीब किंवा मध्यवर्गीय कुटुंबातून येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी देशातील सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस आणि आयएएस होण्याचा सन्मान प्राप्त केलेला आहे.
या अधिकाऱ्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी पूजा यादव यांचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जाते. शिक्षणाचा खर्च निघावा यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे ट्यूशन घेण्याचे काम केले.
त्याचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणा राज्यात झाले. त्यांनी बीएमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं.
त्यानंतर त्यांनी बायोटेक्नॉलॉजी अँड फुड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेकचे शिक्षण घेतले. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना विदेशात नोकरी मिळाली.
त्यांनी कॅनडा तसेच जर्मनीमध्ये रिसेश्पनीष्ट म्हणून नोकरी केली. त्याच काळात त्यांना सरकारी अधिकारी होण्याची इच्छा झाली.
त्यानंतर त्या परदेशातून परत आल्या आणि यूपीएससीची तयारी चालू केली.
त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर 2018 साली दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांचा ऑल इंडिया रँक 174 होता. या रँकसह त्या आयपीएस अधिकारी झाल्या.
त्या गुजरात केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 2021 मध्ये आयएएस अधिकारी विकल्प भारद्वाज यांच्यासोबत लग्न केले.
पूजा यादव