मुंबई : एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. त्यांच्या या दौऱ्यामागे आयकर विभागाच्या नोटिशीचा संदर्भ तर नाही ना असा संशय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. सरडा धोका बघून रंग बदलतो, माणूस मोका बघून रंग बदलतो. पण मोक्यापेक्षा आयकर विभागाचा धोका मोठा असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली दौरा आटोपला. यामध्ये त्यांनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. हा दौरा नेमका कशासाठी याची माहिती मात्र कुणालाच नव्हती. त्यातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आणि अंधारेंनी त्यावरुन एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
आपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्याचसोबत श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं संजय शिरसाट म्हणाले. नंतर त्यांनी यावरून यू टर्न घेतला आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव चुकून घेतल्याचं म्हटलं.
Sushma Andhare Tweet : काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढ्याच फरक आहे; सरडा "धोका" बघून रंग बदलतो.. माणूस "मोका" बघून रंग बदलतो..
गुरुपौर्णिमेचा "मोका" असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा "धोका" त्यापेक्षा मोठा आहे..!! दिघे साहेब बघताय ना..?
Income Tax notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. शिरसाटांकडून त्याची जाहीर कबुली देण्यात आली. संभाजीनगरात एका कार्यक्रमात संजय शिरसाठ यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही असे विधान त्यांनी केलं. पुढं जाऊन हे वक्तव्य फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं. आयकर विभागाने नोटिशीवर 9 जुलैला खुलासा करण्यास सांगितलंय असं शिरसाट म्हणाले.
आधीची निवडणूक आणि आताची निवडणूक यात संपत्ती कशी वाढली असा प्रश्न आयकर विभागाला पडलाय. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat Property : संजय शिरसाटांची प्रतिज्ञापत्रांतली संपत्ती
2019 - 3 कोटी 31 लाख रु.
2024 - 33 कोटी 3 लाख रु.
वाढ - 32 कोटी 72 लाख रु.
ही बातमी वाचा: