Shivani Rangole : ज्येष्ठ मराठी लेखिका आणि अभिनेत्री मृणाल देव (Mrinal Dev) यांच्या मातोश्री वीणा देव (Veena Dev) यांनी सोमवार 29 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 76व्या वर्षी वीणा देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानानंतर त्यांची नातसून आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेने (Shivani Rangole Kulkarni) भावनिक पोस्ट केली आहे. तसेच तिने त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. वीणा देव या मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत्या. त्या नात्याने शिवानी ही त्यांची नातसून होती.
डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या.पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केलं. तिथेच त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. वीणा देव यांचे प्राध्यापक विजय देव यांच्यासोबत लग्न झाले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे म्हणून डॉ. विजय प्रल्हाद देव यांनी काम केले होते.
शिवानी पोस्ट काय?
शिवानीने वीणाताईंसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं की, त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची म्हणून प्रवासात मोजे सोबत ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय!! बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंग साठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्कानी कधीही फोन करायचे आणि त्या ही patiently मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी सीरियल अगदी हॉस्पिटल मध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या!
पुढे तिने म्हटलं की, माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरा सारखा आहे असं म्हणायच्या विराजसला. गमतीशीर किस्से सांगताना डोळ्यांत चमक यायची त्यांच्या. गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन/msg करायचे तेव्हा खूप आनंद व्हायचा त्यांना. हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमानी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधा मध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या ह्याच हसऱ्या आठवणी सोबत घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक असणार आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि येईल, इथून पुढे नेहमीच!
ही बातमी वाचा :
अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना मातृशोक, सोशल मीडियावर भावुक पोस्ट; म्हणाल्या, "शेवटपर्यंत ती..."