Bhushan Pradhan-Anusha Dandekar : मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता भूषण प्रधानची (Bhushan Pradhan) ओळख आहे. अनेक तरुणींच्या फेव्हरेट हिरोच्या यादीतही भूषण आहे. अनेक सिनेमांमधून भूषण हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. नुकताच तो घरत गणपती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण सध्या भूषण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आलाय. अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर हे दोघे नुकतेच जुनं फर्निचर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. त्यामुळे या सिनेमादरम्यान अनुषा आणि भूषणची मैत्री झाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांना अनुषा ही भूषणसोबतच हजर होती. त्यातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. या व्हिडीओमध्ये अनुषा भूषणच्या मित्र मैत्रीणींसोबतही मज्जा करताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या जोडीला पसंती दर्शवली आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पूजा सावंत, तिची बहिण रुचिरा सावंत, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, वैभव तत्त्ववादी ही सगळी मित्रमंडळी त्यांची मैत्रीण प्रार्थना बेहेर हिच्या अलिबागच्या घरी पोहचले. इथेच त्यांनी दिवाळी देखील साजरी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनुषा भूषणच्या मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसली.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच एकाने तर थेट अनुष्का भूषणला डेट करतेय अशी कमेंट केलीये. दुसऱ्या एका कमेंट करत अनुष्का आणि भूषण खूप गोड दिसतायत अशीही कमेंट केलीये. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, भूषणसोबत अनुष्का हा आनंद खरंच डिझर्व्ह करते. ती त्याच्यासोबत खूष दिसतेय. तिला पाहून आता माझ्याही आशा वाढल्या आहेत.
ही बातमी वाचा :
Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षीच मुंबईत घेतलं हक्काचं घर,पाहा फोटो