मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कु्ंद्राला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आले आहे. पॉर्न रॅकेटप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement


क्राईम ब्रान्चने फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्राईम ब्रान्चने या प्रकरणात सोमवारी राज कुंद्रा यांना अटक केली कारण या षडयंत्रात राज कुंद्रा सहभागी आहे. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे असून अधिक तपास सुरू आहे. क्राईम ब्रान्चने राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा अनेक वेळा चर्चेत आले आहे.  






दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रासोबत 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनाही एक मुलगा असून 2012मध्ये त्याचा जन्म झाला होता.गेल्या वर्षी लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनी पुन्हा आई बनली आहे. तिचं नाव समीशा शेट्टी कुंद्रा आहे. समीशाचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आहे.' शिल्पा आणि राज कुंद्रा सरोगसीद्वारे आई-वडील बनले आहेत.