Shilpa Shetty Talks on language Controversy : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘KD: द डेविल’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालाय. टीझर लॉन्च कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादावर भाष्य केलं. तिने म्हटलं, "मी सुद्धा महाराष्ट्राचीच मुलगी आहे..."
‘KD: द डेविल’ चा टीझर रिलीज
‘KD: द डेविल’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षांनंतर अभिनेता संजय दत्तसोबत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शानाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आज, गुरुवारी, एका भव्य कार्यक्रमात या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी शिल्पा शेट्टी, संजय दत्त आणि चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.
मराठी भाषा वादावर शिल्पा शेट्टीचं मत
कार्यक्रमादरम्यान शिल्पा शेट्टीला विचारण्यात आलं की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादावर ती काय म्हणेल? यावर तिने उत्तर दिलं, "मी महाराष्ट्राची मुलगी आहे, मला पण मराठी माहिती आहे. पण आज आपण KD या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही वादाला खतपाणी घालणार नाही. आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे आम्ही तो मराठीतही डब करू शकतो."
शिल्पा-संजयचा ‘KD: द डेविल’ कधी होणार प्रदर्शित?
‘KD: द डेविल’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि संजय दत्त व्यतिरिक्त नोरा फतेही सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे, जो हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शिल्पा शेट्टी यापूर्वी ‘निकम्मा’ या चित्रपटात झळकली होती, जो 2022 साली प्रदर्शित झाला होता. आता ती तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या