Shilpa Shetty Interrogation In 60 Crore Fraud Case: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) रडारवर आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्धच्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणात राज कुंद्राची पाच तास चौकशी करण्यात आलेली. अशातच आता राज कुंद्रापाठोपाठ शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचं आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक सोमवारी शिल्पाच्या घरी पोहोचलं आणि 4:30 तास तिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीनं तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यातील कथित व्यवहारांची माहिती पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान शिल्पानं पोलिसांना अनेक कागदपत्रं दिली, ज्यांची पडताळणी सुरू आहे.

आधी राज कुंद्रा आणि नंतर शिल्पा शेट्टीनं चौकशीत काय सांगितलं? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, फसवणुकीची तक्रार करणाऱ्या दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटींचं कर्ज घेतलेलं. हे कर्ज नंतर कोठारी यांच्या कंपनीत इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आलं. या रकमेतील 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्ट आणि इतर कारणांसाठी वापरले गेले. बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांना या कामासाठी पैसे देण्यात आलेत. राज यांनी पोलिसांना प्रमोशनचे फोटो देखील दिले.

Continues below advertisement

फसवणूक प्रकरणात शिल्पा शेट्टीनं केलंय काय? (What Has Shilpa Shetty Done In Fraud Case?)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी सुरू असलेल्या कंपनीत शिल्पा शेट्टी मोठी शेयर होल्डर आहे, म्हणूनच या प्रकरणात तिचीही चौकशी करण्यात आली. पुराव्यांवरून असं दिसून आलंय की, कंपनीत शेयर होल्डर असूनही, शिल्पानं सेलिब्रिटी फी वसूल केली, जी खर्च म्हणून दाखवण्यात आली होती, ज्यामुळे निधीचा गैरवापर केल्याचं दिसून येतंय.

प्रकरण नेमकं काय? (Shilpa Shetty Raj Kundra 60 Crore Fraud Case)

2025 ऑगस्टमध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध 60.4 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आता बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित 60  कोटी फसवणुकीच्या प्रकरणात सप्टेंबरमध्ये त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक दीपक कोठारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, शिल्पा आणि राज कुंद्रावर आरोप केलाय की, राज आणि शिल्पानं त्यांना 2015 ते 2023 दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bobby Deol Overshadow Ranbir Kapoor In Animal Movie: फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम अन् कित्येक वर्षांनी उजळलं 'या' बॉलिवूड अभिनेत्याचं नशीब, हिरोच्या 3 तास 21 मिनिटांच्या मेहनतीवर फेरलं पाणी