Thane Koper Railway Station News: मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर (Mumbai To Ahmedabad Bullet Train) ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला (Taloja Metro) कसे व्यवस्थित जोडता येईल, हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. काल (6 ऑक्टोबर) एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Continues below advertisement

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील (Bullet Train Project) हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेल ने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्रधीकारानास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या हायस्पीड रेल्वे प्रधीकार्णाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे. अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.

नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जलद गतीने जोडण्यासाठी बोगदा बांधण्याबाबत व्यवहार्यता तपासणार- एकनाथ शिंदे (Navi Mumbai Airport)

नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जलद गतीने जोडण्यासाठी नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई दरम्यान बोगदा बांधण्याबाबत व्यवहार्यता तपासून विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश आज एमएसआरडीसी कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ हा मुंबईतील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी असेल. साहजिकच या विमानतळासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतील. सध्याचे मार्ग अपुरे पडण्याची शक्यता आहे, कारण काळानुरूप नवी मुंबई विमानतळावर विमानांची वाहतूक वाढणार आहे. या विमानतळाची राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी करणे गरजेचे ठरणार असून यादृष्टीने सध्याचा सी लिंक, बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का? याची चाचपणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, एकूणच भू व सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग कसा उपयुक्त ठरेल ते अभ्यासण्यासाठी तसेच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या.

Continues below advertisement

बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्ये (Mumbai Bullet Train News)

भारताचा पहिला 508 किमी लांब बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे.

एकूण 508 किमी पैकी 321 किमी व्हायडक्ट आणि 398 किमी पायरांचे काम पूर्ण झाले आहे.

17 नदी पूल आणि 09 स्टील पूल पूर्ण झाले आहेत.

206 किमीच्या मार्गावर 4 लाखाहून अधिक आवाज प्रतिबंधक बॅरियर्स बसवण्यात आल्या.

206 ट्रॅक किमी ट्रॅक बेड बांधकाम पूर्ण झाले आहे.

मुख्यलाइन व्हायडक्टच्या सुमारे 48 किमीवर 2000 हून अधिक ओएचई मास्त्स बसवण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील 07 पर्वतीय बोगद्यांवरील खोदकाम चालू आहे.

गुजरातमधील सर्व स्थानकांवरील सुपरस्ट्रक्चर काम प्रगत अवस्थेत आहे. महाराष्ट्रातील मुंबई भूमिगत स्थानकावर सर्व तीन उंचावलेल्या स्थानकांचे काम सुरू असून बेस स्लॅब कास्टिंग चालू आहे.

राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Bullet Train Shilphata to Ghansoli Tunnel: बुलेट ट्रेनचा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, पाच किलोमीटर लांब शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण, एकाचवेळी धावणार दोन गाड्या