Bobby Deol Overshadow Ranbir Kapoor In Animal Movie: 2023 चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्यामध्ये एका खलनायकानं नायकाची तीन तासांची मेहनत वाया घालवली आणि तेसुद्धा फक्त आणि फक्त 15 मिनिटांत. नायकानं सिनेमाच्या पहिल्या मिनिटापासून घेतलेली मेहनत खलनायकानं फक्त पंधरा मिनिटांत उधळून लावली.  चित्रपटाची संपूर्ण कहाणीच फिरवून टाकली. आता, खलनायक साकारलेल्या अभिनेत्यानं त्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement


आपण 2023 मधल्या ज्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबाबत बोलत आहोत, त्याचं नाव 'अ‍ॅनिमल' (Animal Movie). ज्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत होता. पहिल्यांदाच, बॉबी देओलनं (Bobby Deol) 'अ‍ॅनिमल' मधल्या भूमिकेबाबत जाहीरपणे भाष्य केलं आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये फक्त पंधरा मिनिटांच्या भूमिकेमुळे रणवीर सिंह झाकोळला गेला का? या प्रश्नावर बोलताना बॉबी देओलनं अनेक गोष्टींचा खुलासा केला.  तसेच, रणबीर कपूरचं कौतुकंही केलं. 


फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलला विचारण्यात आलं की, त्यानं चित्रपटात रणबीर कपूरच्या भूमिकेलाही मागे टाकलं, असं वाटतं का? प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, "असं अजिबात नाही... जर रणबीरला संपूर्ण तीन तासांचा चित्रपट सांभाळायचा असेल तर माझ्याकडे फक्त 15 मिनिटं होती. जर रणबीर ते 3 तास ​​सांभाळू शकला नसता, तर माझी 15 मिनिटं व्यर्थ होती..." 






स्वतःला लकी समजतोय बॉबी देओल... (Bobby Deol On Animal Movie)


बॉबी देओल पुढे बोलताना म्हणाला की, "अ‍ॅनिमल' सिनेमात त्यानं जी भूमिका साकारलीय, ती एवढी स्ट्रॉन्ग होती की, लोक अजुनही तिला विसरु शकलेले नाहीत... मी लकी होतो... पाहा, कोणतीही अॅक्शन फिल्म आणि एक ड्रामा फिल्म हिट होण्याचे चान्सेस तेव्हाच असतात, जेव्हा तुमच्यासमोर तुमच्या तोडीस तोडी कॉम्पिटिटर असतो. त्या दोघांना खरं तर जिंकण्याच्या उद्देशानं काम करायचं असतं. असं होऊ शकत नाही की, जर ऑडियन्सला हे माहीत आहे की, हिरोच जिंकणार, मग फिल्मची गंमत राहत नाही... त्यामुळे हा सस्पेन्स राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं..."


दरम्यान, बॉबी देओलनं अ‍ॅनिमलमध्ये अबरार हकची भूमिका साकारलेली. त्यानं एका क्रूर खलनायकाची भूमिका साकारली आणि सर्वांना चकित केलं. संदीप रेड्डी वांगा यांच्या या सिनेमाची खूप चर्चाही झालेली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bollywood Actor Life Story: 70 पेक्षा जास्त फिल्म्समध्ये झळकलेला 'चिमुकला' अभिनेता; राजेश खन्नांपासून अमिताभ बच्चनपर्यंत बड्या स्टार्ससोबत केलंय काम, ओळखलं का कोण?