Sher Shivraj : शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली, असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या लूकमध्ये दिसत आहे. जावळीच्या गर्द झाडीत शत्रूला चकवा देण्याची त्यांची योजना या पोस्टरमध्ये दिसत आहे.
पाहा पोस्टर :
‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच... तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ ‘छत्रपती शिवाजी महाराज!’ असं खास कॅप्शन देत लेख-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हे पोस्टर शेअर केले आहे.
‘या’ दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काय आहे कथानक?
‘शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.
हेही वाचा :
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
- Oscar 2022 : ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha