Sher Shivraj : अफझल खानाच्या वधाची थरारक कथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘शेर शिवराज’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, या चित्रपटाने आतापर्यत तब्बल 4.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत.


‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' हे चौथे चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटातून घडलं आहे.


 





प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटातून घडलं आहे.


दिग्गज कलाकारांची फौज!


'शेर शिवराज' या चित्रपटात चिन्मय मांडलेकर ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या भूमिकेत दिसत आहेत. तर, ‘अफजलखाना’च्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसत आहेत. ‘जिजाऊ आऊसाहेबां’च्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर ‘सुभेदार तानाजी मालुसरे’, दिग्पाल लांजेकर ‘बहिर्जी नाईक’,  वर्षा उसगांवकर ‘बडी बेगम’, समीर धर्माधिकारी ‘कान्होजी जेधे’, मृण्मयी देशपांडे ‘केसर’च्या भूमिकेत, तर अक्षय वाघमारे ‘पिलाजी गोळे’,  विक्रम गायकवाड ‘सरनोबत नेताजी पालकर’, आस्ताद काळे ‘विश्वास दिघे’,  वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील ‘गोपीनाथ बोकील’,  सुश्रुत मंकणी ‘येसाजी कंक’, दीप्ती केतकर मातोश्री ‘दिपाईआऊ बांदल’, माधवी निमकर मातोश्री ‘सोयराबाई राणीसरकार’, ईशा केसकर ‘मातोश्री सईबाई राणीसरकार’, रिशी सक्सेना ‘फाझल खान’ची, तर निखील लांजेकर ‘नरवीर जीवा महाले’, तसेच बिपीन सुर्वे ‘सर्जेराव जेधे’ यांच्या भूमिकेत आहेत.


हेही वाचा :