Nach Baliye 10 : भारतीय प्रेक्षकांमध्ये रिअॅलिटी शोची चांगलीच क्रेझ आहे. 'नच बलिए' (Nach Baliye) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नच बहिए 10' सध्या चर्चेत आहे. यंदाच्या पर्वाची निर्मिती बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


मीडिया रिपोर्टनुसार,'नच बहिए 10'साठी (Nach Baliye 10) मोहसिन खान (Mohsin Khan) आणि रुपाली गांगुलीला (Rupali Ganguli) विचारणा झाली आहे. मोहसिन खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत कार्तिकच्या भूमिकेत होता. तर रुपाली गांगुली 'अनुपमा' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होती. तसेच शहनाज गिलदेखील (Shehnaaz Gill) या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर , टेरेंस लुईस आणि वैभवी मर्चेंटच्या नावाचादेखील परिक्षकांच्या नावांत समावेश आहे. 


'नच बलिए 10' कधी सुरू होणार? 


'नच बलिए 10' (Nach Baliye 10) हा स्टार प्लसवरील (Star Plus) लोकप्रिय कार्यक्रम असून तो लवकरच सुरू होणार आहे. 'बिग बॉस' फेम प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी 'नच बलिए 10' होस्ट करताना दिसेल. 2022 मध्ये 'नच बलिए 10' सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) मुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. 2019 नंतर आता 2023 मध्ये हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. 










'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे विनोदवीर कृष्णा सुदेन आणि त्यांची पत्नी कश्मीरा शाह हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करताना दिसणार आहेत. 


'नच बलिए' हा सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात 10 सेलिब्रिटी जोड्या सहभागी होतात. त्यामुळे  हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतो. आता या पर्वात कोणत्या सेलिब्रिटी जोड्या सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 05 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!