Shefali Jariwala Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालानं (Shefali Jariwala) वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी तिचं निधन झालं. शेफालीच्या अकाली (Shefali Jariwala Video) निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. शेफालीचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं, पण हे किती खरं आहे, हे अद्याप उघड झालेलं नाही. अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराला सर्व प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. अलिकडेच एनडीटीव्हीने शेफालीची जवळची मैत्रिण रोझलिनशी बातचित केली. रोझलिन (Actress Roslin) काही दिवसांपूर्वीच शेफालीचा पती पराग त्यागीला (Parag Tyagi) भेटलेली.
अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या रोझलिन खाननं NDTV शी बोलताना सांगितलं की, "शेफालीच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वीच मी परागची भेट घेतलेली. तिनं सांगितलं की, तो कुणाच्यातरी ऑफिसमध्ये बसलेला आणि त्याचा एक सिनेमा सुरू होता. त्याच दरम्यान मी त्याच्याशी बोलले. मी त्याला विचारलं की, सध्या काय सुरूये तुझं? पराग म्हणाला की, मी एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे." पुढे बोलताना रोझलिन म्हणाली की, "त्याच्या आणि माझ्यामध्ये हे संभाषण झालेलं, पण ना त्याला माहीत होतं अन् ना मला माहीत नव्हतं की, त्याच्या आयुष्यात एवढी मोठी घटना घडणार आहे."
27 जूनला शेफाली म्हणाली, 'अलविदा'
शेफाली जरीवालानं 27 जून रोजी जगाचा निरोप घेतला. 28 जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी, तिचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित होते. शेफालीच्या अंत्यसंस्काराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी शेफालीचा पती पराग त्यागीची अवस्था अंत्यत वाईट होती. आपल्या लाडक्या पत्नीला अखेरचा निरोप द्यावा लागतोय, यावर परागचा विश्वास बसत नव्हता. परागचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले, ज्यामध्ये तो शेफालीच्या पार्थिवाजवळ बसून तिच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवत होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :