Marathi Actor Sanjay Khapre On Sundarya Gay Carector Role: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Industry) 'दे धक्का' (De Dhakka Movie) सिनेमानं बॉक्स ऑफिस गाजवलेलं. पुढे या सिनेमाचा सीक्वेलही प्रदर्शित करण्यात आला. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे दिग्दर्शित मल्टिस्टारर सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला. अशातच या सिनेमातल्या एका पात्राची विशेष चर्चा झालेली. ते पात्र म्हणजे, सुंदऱ्या (Soundarya). ही भूमिका साकारलेली मराठमोळे अभिनेते संजय खापरे (Marathi Actor Sanjay Khapre) यांनी. त्यांनी साकारलेल्या सुंदऱ्याच्या भूमिकेनं अभिनेत्याला एका वेगळ्याच उंचीवर प्रसिद्धी मिळवून दिली. पण, ज्या भूमिकेनं प्रसिद्धी मिळवून दिली, पुढे तिच भूमिका अभिनेत्यासाठी डोकेदुखी ठरली.
'दे धक्का'मधल्या समलैंगिक भूमिकेबाबत काय म्हणाले संजय खापरे?
मराठी अभिनेते संजय खापरे (Sanjay Khapre) यांनी नुकतीच 'इट्ट्स मज्जा'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान ते 'दे धक्का' चित्रपटातील 'गे'च्या भूमिकेविषयी त्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केलं. ते म्हणाले की, "मला असं वाटतं आपण केलेलं कोणतंही काम फुकट जात नाही. ते बरोबर लोकांच्या लक्षात राहतं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की. आपण इथे किती रमायचं. टाईपकास्ट व्हायला खूप चान्सेस असतात. आपल्याकडे लोक हा विनोदी नट आहे, तर लगेच तसा स्टॅम्प मारतात."
"मला दे धक्का केल्यानंतर त्याच पद्धतीच्या अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. पण, माझ्यासाठी ती आव्हानात्मक भूमिका होती म्हणून मी ती केली. मला परत त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. तेव्हा माझ्याकडे प्लॅन बी तयार होता. मी डिझायनिंग करत होतो त्याच्यामध्ये रमत होतो. सांगायचा मुद्दा एवढाच की, कामाची गरज प्रत्येकाला असते. पण, उगाच काहीतरी करायचं आणि तिथे अडकून पडायचं आणि आयुष्यभरासाठी तो स्टॅम्प लावून घ्यायचा, ते मला नको होतं.", असं संजय खापरे म्हणाले.
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांमधून संजय खापरेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या अभिनेत्यानं अनेक दमदार सिनेमांमध्ये काम केलं. 'दे धक्का', 'गाढवाचं लग्न', 'फक्त लढ म्हणा' तसेच 'डिस्को सन्या' यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मराठी इंडस्ट्री गाजवणारा 'दे धक्का' सिनेमा 2008 साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. एका क्रेझी कुटुंबाची कथा पाहताना प्रेक्षक बेभान झालेले. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे आणि गौरी इंगवले यांसारख्या कलाकारांच्या अभिनयानं 'दे धक्का' वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :