Ritesh Deshmukh Will Be Subhash Ghai Next Heroine: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) बॅक टू बॅक नवनवे सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमा हिट ठरो किंवा फ्लॉप पण, त्या सिनेमातली रितेशची भूमिका प्रेक्षकांना भावतेय. अशातच आता रितेश देशमुख आणखी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्गज फिल्म प्रोड्युसर सुभाष घई (Film producer Subhash Ghai) यांनी सोमवारी त्यांच्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर रितेश देशमुखसोबत पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. पण, त्यापोस्टमध्ये त्यांनी रितेशचा जो फोटो शेअर केलाय आणि त्या फोटोसोबत जे कॅप्शन लिहिलंय त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

फिल्म प्रोड्युसर सुभाष घई यांनी सोमवारी त्यांच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी इंस्टाग्रामवर बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या पुढच्या सिनेमात असल्याचं जाहीर केलं. त्यांनी पोस्टमध्ये रितेश देशमुखची ओळख चित्रपटाची 'अगली हिरोईन' म्हणून ओळख करुन दिली आणि त्यासोबत रितेशचा स्त्री पात्राच्या भूमिकेतला फोटो शेअर केला आहे. सुभाष घईंची पोस्ट पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. सुभाष घई यांनी शेअर केलेला फोटो 'अपना सपना मनी मनी'मधील आहे. 

सुभाष घई पोस्टमध्ये काय म्हणाले? 

सुभाष घई यांनी आपल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मुक्ता आर्ट्स अंतर्गत येणाऱ्या आमच्या आगामी चित्रपटात ही आमची 'पुढची नायिका' आहे. एक क्लासिक सौंदर्य... तुम्ही या सुंदर मुलीचे नाव सांगू शकाल का?" 

सुभाष घईंच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. युजर्सनी एका फटक्यात रितेश देशमुखला ओळखलं असून रितेश आणि सुभाष घईंवर आगामी सिनेमासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. कमेंटमध्ये युजर्स रितेश देशमुख आहे, असं सांगत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "ती रितेश देशमुख आहे...", आणखी एका युजरनं लिहिलंय की, "ती रितेश आहे. खूप गोड... चित्रपट नक्कीच सुपरहिट होईल सर..." पुढे एका युजरनं लिहिलंय की, "वाह, रितेश देशमुख नायिकेच्या भूमिकेत आहे. ते पाहणं खूप छान असेल...".

सुभाष घईंनी केलेल्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये काही जणांनी अंदाज बांधला आहे की, "हा फोटो 'अपना सपना मनी मनी' सिनेमातला आहे. एका युजरनं कमेंट केली आहे की, "अपना सपना मनी मनी' सिनेमातला सीन आहे. ही रितेश सरांची सुपरहिट फिल्म होती. यामध्ये उत्तम कॉमेडी सीन्स होते." दरम्यान, अद्याप सुभाष घईंनी केलेली पोस्ट खरंच नव्या सिनेमाची घोषणा आहे की, फक्त मस्करी आहे, याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटासोबत काही दिवसांपूर्वीच्या इंटरव्यूमध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं की, त्यांनी फिल्म करणं बंद केलं आहे. ते म्हणालेले की, "ही फक्त एक वस्तू आहे, मला लोकांमध्ये प्रेम दिसत नाही, मला टीममध्ये प्रेम दिसत नाही. मला प्रत्येकजण फक्त काम करताना दिसतंय, बिचारे..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Actor Sanjay Khapre On Sundarya Gay Carector Role: ''दे धक्का'नंतर अनेक समलैंगिक भूमिकांसाठी ऑफर आल्या, पण...'; अभिनेत्यानं 'त्या' भूमिकेबाबत उलगडून सांगितलं