Nivedita Saraf Faces Trouble at Polling Booth: आज राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सामान्य व्यक्ती, सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. गेल्या काही दिवसांनी प्रत्येक पक्षातील नेत्यांनी जोरदार प्रचार केला. दरम्यान, मतदारराजा कुणाचं पारडं मतदानाद्वारे जड करणार, हे लवकरच कळेल. लोकशाहीच्या उत्सावात सर्वे सामील झाले. मात्र, काहीवेळेला घोळही होतो.यामुळे मतदार राजाची उडते. यंदाच्या निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार घडला. मतदान केल्यानंतर बोटांना लावण्यात येणारी शाई, मतदान यादीत नाव नसणे, यामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळही उडाला. अशातच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही मतदान केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराचा त्रास झाला.
निवेदिता सराफ यांचं मतदार यादीत नाव नाही
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी संताप व्यक्त केला. सराफ म्हणाले की, "मी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर गेले. तेव्हा मतदार यादीत माझे नव्हते. नंतर मला 25 नंबरच्या बुथवर जाण्यास सांगितले. त्या बुथवर माझे नाव होते. सगळ्या सोसायटींचे गट पाडण्यात आले आहेत. त्या गटातील मतदार मतदान केंद्रावर येतील आणि मतदान करतील, असं ठरवण्यात आलं. मग आमच्या बिल्डिंगची नावं त्यात का नाहीत?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवेदिता सराफ संतापल्या, नेमकं काय घडलं?
"माझे नाव मतदार यादीत आहे, पण नंबर नाही. तर, दुसरीकडे 25 नंबर असल्याचे सापडले. मी तिथे गेले तोवर तेथील कर्मचारी निघून गेली. तिथे मोबाईल आत नेऊ देत नाही, नाहीतर या प्रकरणाचा मी फोटो काढला असता", असं त्यांनी संतापात म्हटलं. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर घडलेल्या गैरप्रकाराबाबत राग व्यक्त केला.
मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ
दरम्यान, केवळ निवेदिता सराफ यांच्या नावाचा मतदार यादीत घोळ झाला नाही तर, वनमंत्री गणेश नाईक यांचे देखील मतदार यादीत नाव नव्हते. गणेश नाईक हे सकाळीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते. मात्र, गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत नव्हते. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांचे नाव सापडले. दरम्यान, बऱ्याच नागरिकांना या गोंधळाचा नाहक त्रास सहन करावा लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
वास्तव चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची मोठी फसवणूक; आर्थिक गंडा घातला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
वडील वारले.., अजय-अतुल शोकात तरीही.. तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला, हे गाणं कसं तयार झालं?