Shashank Ketkar :  सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. त्यांच्या या मुद्द्यांची दखलही घेतली जाते.नुकतच अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये शशांकने अस्वच्छेतेवरुन निशाणा साधलाय. यापूर्वीही शशांकने त्याच्या सोशल मीडियावरुन याच मुद्द्यावरुन भाष्य केलंय. पण यावेळी त्याने केलेल्या व्हिडीओची महापालिकेकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे.  


शशांकच्या तक्रारीची महापालिकेकडून दखल घेण्यात आली. त्यावर शशांकने पोस्ट करत म्हटलं होतं की, 'मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार...मी तक्रारीचा व्हिडीओ टाकला आणि तुम्ही लगेच कारवाई केली. मला कल्पना आहे, सुधारणेला अजून खूप वाव आहे पण हेही नसे थोडके!'


शशांकने व्हिडीओमध्ये काय म्हटलं होतं?


शशांकने कचऱ्याचा तो व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं की, , “काय करायचं? मी रोज सकाळी घोडबंदर रोडवरून मढ आयलँडला शूटिंगला येतो. किमान दीड ते पावणे दोन तास गाडी चालवत रोज येतो, रोज जातो. त्या घोडबंदर रोडची अवस्था, त्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले आहेत. तिकडे इतकी घाण अवस्था आहे की विचारुच नका. तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था आहे मढ आयलँडच्या रस्त्यांची. ज्या मढ आयलँडवरती काही नाही म्हटलं तरी वेगवेगळ्या भाषेची मिळून 50 वगैरे शूट चालू असतात. इतका महसूल गोळा करणारा मुंबईतला हा एक भाग आहे. पण, त्या भागातल्या रहिवाश्यांची जी काही गैरसोय होतेय ती बघण्यासारखी आहे.


याच व्हिडीओला कॅप्शन देत शशांकने म्हटलं होतं की, सरकार कोणतेही असो… आपली आणि आपल्या देशाची अवस्था कधी सुधारणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची? इतका निर्लज्ज पणा येतो कुठून?सरकार बदललं की सगळं बदलेल वगैरे फालतू पर्याय सुचवू नका! गेली अनेक वर्ष आपला देश अस्वच्छ देशांच्या यादीत अग्रेसरच आहे.. त्यामुळे या आधीच्या अनेक सरकारांनी सुद्धा काही आपल्याकडे, या issues कडे, सपशेल दुर्लक्षच केलं आहे.काहीतरी कायमस्वरूपी उपाय हवा आहे देशाला...माझा हा राग, संताप ….हा या अवस्थेबद्दल आहे… कोणा एका व्यक्ती किंवा party बद्दल नाही. 










ही बातमी वाचा : 


Aabhalmaya : 'अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण...', 'आभाळमाये'ची 25 वर्ष; अभिनेत्रीची खास पोस्ट