Sharad Ponkshe on Chhaava Movie : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्याची आणि दैदिप्यमान पराक्रमाची ख्याती रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' हा सिनेमा काल  शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला आणि लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar)  दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळाले आहे. परिणामी 'छावा' (Chhaava Movie) सिनेमा सध्या देशभरात आणि त्यातल्या त्यात मराठी मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement


तर दुसरीकडे बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर एखादा ऐतिहासिक चित्रपट साकारण्याच्या धाडसाचे आणि  शंभूछत्रपतींचे वादळी आयुष्य सर्वांपर्यंत चित्रपटातून पुढे आणण्याच्या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर 'छावा' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देत या सिनेमाचे आणि सर्व कलाकारांचे तोंडभरून कौतुक केलं आहे.


नेमकं काय म्हणाले अभिनेते शरद पोंक्षे ?


'नमस्कार! मी आताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला. खूपच सुंदर सिनेमा बनवलाय. प्रत्येक हिंदुस्थानीने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा सिनेमा जरुर बघावा. रक्त सळसळतं डोळ्यातून अश्रु थांबत नाहीत.


आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी,  आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट सोसले, आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सीमा पार केल्या. लक्ष्मण उतेकर साहेबांनी या सिनेमाला खूप सुंदर पद्धतीने चित्रित केलं आहे. मानलं पाहिजे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. सिनेमातील जितके पण मराठी आहेत त्या सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अनेक वर्षांनी एक उत्कृष्ट ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळाला.' असं शरद पोंक्षे यांनी पुढे म्हटलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्या भवाना व्यक्त केल्या आहेत. 




मी हात जोडून विनंती करतो की.... 


'या सिनेमाचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच. ज्या पद्धतीने त्यातील शब्द लिहल्या गेलेत आणि ए. आर. रहमान यांचं बॅकग्राऊंड म्युझिक खूपच सुंदर. मात्र शेवटी औरंगजेबने आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रुरपणे हत्या करतो ते पाहवत नाही. जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशव्यांसारखे महानायक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले, आणि सध्याची तरुण पिढी. शिकायला पाहिजे आपण. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने, प्रत्येक हिंदुस्थानीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत हा छावा सिनेमा आवर्जुन पाहावा. मी हात जोडून विनंती करतो की, आताच तिकीट काढा आणि छावा बघा.' अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी या सिनेमाचे कौतुक केलं आहे. 


हे ही वाचा