Sharad Kelkar on Hindi compulsory : टीव्हीपासून ते बॉलिवूड आणि दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता शरद केळकर याने सध्या देशात सुरु असलेल्या भाषावादावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा सुंदर आहेत आणि मी सर्व भाषांचा आदर करतो, अशी प्रतिक्रिया शरद केळकर याने व्यक्त केली आहे. यासोबतच त्याला टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारत सरकारने अलीकडेच सर्व राज्यांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा आदेश दिल्यानंतर, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात हिंदीविरोधी भावना उफाळून आल्या आहेत. शरद केळकर हा मराठी भाषिक भागातून येतो. मात्र, त्यांने स्वतःला प्रथम भारतीय असल्याचं सांगितलं. शरद केळकर म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं तर मला राजकारणात शिरायचं नाही. मला याच्यात काहीच स्वारस्य नाही. तुम्ही मला अभिनयाबद्दल विचारा, मी नक्की बोलेन. माझं असं मत आहे की भारतातल्या सर्व भाषा उत्कृष्ट आहेत. आणि मी सर्वप्रथम एक भारतीय आहे.”

शरद केळकर लवकरच एका नव्या शोमध्ये दिसणार आहेत. या शोसाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही या आगामी शोसाठी सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेता आहात का, तेव्हा त्याने उत्तर दिलं, “मी खूप काळापासून काम करतो आहे. मी माझ्यासाठी ही ओळख तयार केली आहे आणि हो, म्हणूनच मी जास्त मानधन घेतो.”

जास्त मानधन घेणं काही वेगळं नाही – शरद केळकर

शरद पुढे म्हणाला, “मला असं वाटत नाही की यामध्ये काही वेगळं आहे. जर कोणी चांगलं कमावत असेल तर लोकांनी आनंद मानावा, हेवा नाही. हे त्या व्यक्तीच्या यशाचं प्रतीक आहे. जर एखादा अभिनेता पुन्हा टीव्हीवर परत येत असेल तर त्याचा खूप मोठा अर्थ आहे. कोणीही तुम्हाला फक्त जुन्या आठवणींसाठी परत बोलावत नाही – तुम्हाला काहीतरी सादर करावं लागतं.”

आजकालचे टीव्ही शो चालत का नाहीत आणि अभिनेते घराघरात प्रसिद्ध का होत नाहीत? यावरही शरदने भाष्य केलं. तो म्हणाला की, “दर्शकांचा दृष्टिकोन आता बदलला आहे. ओटीटीवर नव्या शो आणि प्लॅटफॉर्म्स येत आहेत. आधी शो वर्षानुवर्षे चालायचे आणि पात्रं लोकांच्या मनात घर करायची. आता शो लहान असतात आणि लोक लवकर पुढे जातात. अनेक अभिनेत्यांना वाटतं की त्यांना ओळख मिळत नाही, पण मला वाटतं की पात्रं लोकप्रिय होतात, अभिनेता स्वतः नाही. मला नाहर सिंह, बैरी बी., ठाकुर, आणि डॉ. आशुतोष – या पात्रांच्या नावाने ओळखलं जातं.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भारतातील सर्वात महागडा सिनेमा, 1600 कोटींचं बजेट; रणबीर कपूर की यश कोणाचं मानधन जास्त?

'कोंबडी पळाली' गाण्यावर क्रांती रेडकर आणि भरत जाधव यांचा भन्नाट डान्स, Filmfare कडून पुन्हा शेअर VIDEO