Sanjay shirsat : मुंबईत वरळी डोममध्ये आज ( 5 जुलै ) हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याच्या पाश्वभूमीवर 'विजय मेळावा ' पार पडला . ठाकरे बंधूंनी मराठीसह अनेक मुद्दयांवरून सरकारचा खरपूस समाचार घेतला . गुजरातचे व्यापारी उद्योगधंदे यावरून उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली . यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही त्यांनी फटकारल्याचं दिसलं . तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मराठीसह इतर मुद्दयांवर सरकारवर जहरी टीका केली . यावरूनच आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय . राज ठाकरेचं भाषण संयमी - मुद्देसूद, उद्धव ठाकरेंचे तेच टोमणे असल्याचं ते म्हणालेत . ठाकरे बंधूंच्या युतीवरही ते बोललेत . छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेताना ते बोलत होते.
राज ठाकरेंचं भाषण संयमी, मुद्देसूद, उध्दव ठाकरेंचे तेच टोमणे
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले,'आजचा जो त्यांचा मेळावा झाला तो चांगला झाला, महाराष्ट्राने पाहिले दोन भाऊ एकत्र आले. मात्र सर्वांची नजर राज ठाकरे यांच्याकडे होती... राज यांचा रोख कोणाकडे याकडे लक्ष होते.. राज ठाकरेंनी अत्यंत संयमी आणि मुद्देसूद भाषण केल.मराठी का हवी, हिंदी का नको, घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचा भाषण होत. काही लोक राजकीय अंदाज बांधण्याचा लागले होते, मात्र काहीही नाही. मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी एकत्र आलो असे राज म्हणाले. कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, काही कॉम्रेड इत्यादी इतर पक्षाचे नेते आले होते, त्यांनी सांगितलं असेल. पक्षाबाबत न बोलता फक्त मराठी बाबत बोलावं.
उबाठाचें तेच टोमणे होते. भाषणामध्ये जो प्रतिसाद राज ठाकरे यांना मिळाला तो उद्धव ठाकरे यांना मिळाला नाही. हा मेळावा मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी होता असाच फक्त. या गोष्टीचा आणि टोमण्याचा काय संबंध. तुम्ही लुंगीधरून डान्स केला नाही का? तुम्ही जय गुजरात म्हंटले नाही का? शिंदेंनी काही चुकीच बोलले नाही. एक समाज समोर बसला होता, का एखाद्या समाजाला दूर लाटण्याचा प्रयत्न करतो.ज्या ज्या प्रांतात जातो, त्याठिकाणी बोलावं लागतं. यांनी ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला आणि हिंदीत भाषण केले. म्हणून मराठीचा स्वाभिमान गाडले असे म्हणायचे का? मराठी भाषेला कुणीही नखं लावू शकत नाही. हे अधोरेखित आहे. असेही मंत्री शिरसाट म्हणाले.
एकत्र या एकत्र रहा, आमच्या पोटात दुखायचं कारण नाही
राजकारणात हवा तयार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे भाषण करतांना राज यांच्या चेहऱ्यावर कुठलीही हावभाव न्हवते... कोणती झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राज ठाकरे यांची उपस्थिती होती..राज ठाकरे यांनी सरळ कमिटमेंट केली असेल की, मला मराठी बाबत जे वाटते ते बोलले. आणि त्यांनी ते बोलले. हा युतीचा मेळावा नव्हता, मराठीसाठी प्रेम दाखवण्यासाठी हे होतं. एकत्र या एकत्र रहा, आम्हाला वाईट वाटायचं, पोट दुखायचं काहीही कारण नाही. राज ठाकरे हे मराठी भाषेच्या विषयालाधरून परखड भूमिका मांडली. असंही मंत्री शिरसाट म्हणाले.
ही युती होणार नाही, आम्हाला राज ठाकरेंचा स्वभाव माहितीय
बाबा बुवा हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही इतरांची चिंता करू नका..राज ठाकरेंच्या पक्षातील लोकांची बाहेर जाण्याची संख्या कमी आहे. त्या मानाने ठाकरेंच्या शिवसेनेतून जास्त लोक जात आहे. त्यानं आता राज ठाकरे बरोबर आल्यानंतर चांगल वाटलं असेल कुणीतरी आमच्या सोबत आहे...युती एवढी सोपी नाही मार राज उद्धव यांची युती झाली तर महा विका आघाडी अस्तित्वात राहणार नाही.आम्ही देखील बाळासाहेब यांचे विचार घेऊन चाललो आहे... अंतर पाट काढला म्हणतात पण कोण नवरा आणि कोण नवरी...ही युती होणार नाही, आम्हाला राज ठाकरे यांचं स्वभाव माहिती आहे. आज युतीवर बोलणे उचित होणार नाही. ठाकरे बंधूंची युती झाली तरी आम्हला यांचा एकत्रीकरणाचा कुठलाही फरक पडणार नाही.. उलट दोघांना पक्षांतर्गत फटका बसेल... राज ठाकरे हे सगळ्यांचे मित्र आहे. ते संकुचित नाहीत. राजकारण आणि मैत्री वेगळी असते त्यांनी ते जपले आहे...गुंडगिरी कशाला म्हणता हे समज राऊतला समजायला पाहिजे. दलाली करण्याएवढी गुंडगिरी सोपी नाही त्यासाठी मनगटामध्ये दम पाहिजे..असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवरही टीका केली.
हेही वाचा