siddhanth kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर (shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूरला (siddhanth kapoor) बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत हजर होता. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं. आता  सिद्धांत आणि आणि इतर चार जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांना यापुढे जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांसमोर हजर राहावे लागेल' अशी माहिती डीसीपी पूर्व बेंगळुरू भीमा शंकर गुलेद यांनी दिली आहे. 

Continues below advertisement


भीमाशंकर एस. गुलेद यांनी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याने ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न झालं होतं. त्याच्या रक्त तपासणी अहवालात त्यानं ड्रग्जचं सेवन केल्याचे समोर आले. त्याला उलसूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलिसांनी पार्टीमध्ये सात 'एक्स्टसी' गोळ्या आणि गांजाची पाकीटही जप्त केले.






सिध्दांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाला', 'चेहरे', अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये सिद्धांतनं काम केले आहे. त्याने 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'ढोल', 'भागम भाग' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका सिद्धांतनं साकारली होती. 


हेही वाचा :