Shahrukh Khan FA9LA Song Viral Video: 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमातील अक्षय खन्नावर (Akshaye Khanna) चित्रित करण्यात आलेलं बहरीनचं रॅप ट्रॅक FA9LA (Bahrain Rap Track FA9LA) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. या रॅप ट्रॅकवरचा अक्षय खन्नाच्या खास डान्स मूव्ह्सचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जातंय. अशातच सध्या AI चा जमाना आहे. या जमान्यात कोण, कधी काय करेल? याचा नेम नाही. असाच एक व्हिडीओ एका युजरनं सोशल मीडियावर पोस्ट केला आणि बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एका युजरनं क्रिएटिव्ह एडिटिंगद्वारे अक्षयच्या जागी शाहरुख खानला (Shah Rukh Khan) त्या सीनमध्ये एडिट केलंय. जिथे अक्षय खन्ना दिसतो, तिथे शाहरुख खान दिसतोय. ही क्लिप सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ एवढा हुबेहुब एडिट केलाय की, शाहरुखचा एडिटेड सीन हुबेहुब अक्षय खन्नाच्या सीनसारखा आहे.  

Continues below advertisement

व्हिडीओ व्हायरल होताच शाहरुख, अक्षयच्या चाहत्यांमध्ये जोरदार जुंपली 

FA9LA मध्ये अक्षय खन्नाऐवजी शाहरुख खानची एडिटेड एन्ट्री पाहून युजर्सच्या तोंडाला फेस यायचाच बाकी राहिला. अक्षय खन्नाचे चाहते तर, या व्हिडीओवर कमेंट करुन अक्षय खन्नानंच चांगलं केल्याचं वारंवार सांगत आहेत. त्या भूमिकेत अक्षय खन्नापेक्षा दुसरं कुणी बसूच शकत नाही, असं अक्षयच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "अक्षय खन्नाची वेळ सुरूये... त्याचा अंदाज अनोखा आहे..." आणखी एका युजरनं म्हटलंय की, "शाहरुख खानचा चाहता आहे, पण या खास सीनमध्ये अक्षय खन्नानं कमाल केली आहे..."

दरम्यान, शाहरुख खानचे चाहते उत्साहित आहेत. ते म्हणतात की, जर शाहरुख या भूमिकेत असता तर चित्रपट आणखी सुपरहिट ठरला असता. एका युजरनं कमेंट केली आहे की, "चित्रपट आणखी मोठा हिट झाला असता, माशाअल्लाह, काय तो सीन होता!" दुसऱ्यानं म्हटलंय की, "किंग खान जे काही करतो, ते अद्भुत दिसतं..."

Continues below advertisement

'धुरंधर'ची स्टारकास्ट 

आदित्य धर दिग्दर्शित, हा स्पाय थ्रिलर चित्रपट प्रामुख्यानं रणवीर सिंहच्या अवतीभोवती फिरतो, ज्यामध्ये अक्षय खन्नानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अली खान यांचा समावेश आहे. सहाय्यक भूमिकांमध्ये राकेश बेदी आणि मानव गोहिल यांचा समावेश आहे. 

5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. चित्रपटाचं बजेट सुमारे 280 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे, तर आतापर्यंत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. बहरीन रॅपर फ्लिपराचीचं मूळ गाणं 'FA9LA'चं 'धुरंधर'च्या यशात महत्त्वाचं योगदान आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar BO Day 10: 'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?