मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा कायमच त्याच्या कामासोबतच कुटुंबालाही प्राधान्य देताना दिसतो. आई, भाऊ, पत्नी आणि मुलांना पुरेसा वेळ देणारा हा अभिनेता या कारणामुळंही चाहत्यांची मनं जिंकतो. शाहिद आणि त्याच्या आईचं खास नातं. पण, शाहिद जन्माला आल्यानंतर त्याची जबाबजारी सांभाळण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या आईसाठी सोपा नव्हता. पतीच्या निर्णय़ाखातर त्यांनी दु:खही आपलंसं केलं होतं.
नीलिमा अझीम यांनी पंकज कपूर यांच्यासोबतच्या नात्यातून वेगळं होण्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला. शाहिद कपूरच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. वयाच्या 21 व्या वर्षी नीलिमा अझीम यांना मातृत्त्वाची चाहूल लागली होती. नीलिमा यांना दिवस गेल्याचं माहिती होण्याच्याच पूर्वी पंकज कपूर यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात नशीब आजमाजवण्यासाठी मुंबई गाठली होती. शाहिदच्या जन्मानंतर आपल्या पालकांनीच त्याच्या संगोपनात मोलाची मदत केली होती, ही बाबही त्यांनी सर्वांसमोर आणली.
Mother's Day 2021 : नवजात बालकांच्या साथीनं 'या' सेलिब्रिटी साजरा करत आहेत 'मदर्स डे'
आई-वडिल विभक्त होण्याचं कळताच शाहिदची काय प्रतिक्रिया होती, याबाबत सांगताना त्यांनी म्हटलं, 'तो अगदीच लहान होता. तो साडेतीन वर्षांचा होता. दिल्लीत त्याचा जन्म झाला. जेव्हा पंकजनं मला फार आधीच त्याच्या करिअरच्या निर्णयामुळे एकटं सोडून मुंबई गाठली होती आणि मी आईवडिलांसोबत राहत होते'. आम्हाला मी गरोदर असल्याचं कळण्यापूर्वीच पंकज कपूर यांनी मुंबई गाठल्याचं ही त्या म्हणाल्या. पतीनं करिअरसाठी घेतलेल्या निर्णयात आपण त्यांना साथ दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
गरोदर काळात आपल्या पालकांनी आणि भावानं काळजी घेतली होती, किंबहुना शाहिदच्या जन्मानंतरही आपण पालकांच्याच घरी होतो असं म्हणत पंकज आणि माझं एकत्र असं घर कधीच नव्हतं, शाहिद आमच्यासोबतच दिल्लीत राहत होता, अशा शब्दांत त्यांनी गतकाळातील दिवस सर्वांसमोर आणले.