Shahid Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. शाहिदनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. पोस्टमधील अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या फोटोमुळे आता त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

Continues below advertisement


शाहिदनं त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ईशान आणि अनन्य यांचे रोमँटिक पोजमधील फोटो आहेत. त्यामुळे आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.  ईशान आण आणि अनन्यानं खाली-पिली या चित्रपटामध्ये काम केले आहे. तेव्हापासूनच ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरू होती. 





काही दिवसांपूर्वी अनन्याचा गेहराईंया हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अनन्यासोबतच दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी  आणि धैर्य कारवा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha