Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता. 


मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, 'ती जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा तिला एका व्यक्तीनं ब्रेस्ट सर्जरी म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला.' 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ओम शांती ओम हा दीपिकाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खाननं केलं होतं. तसेच दीपिकासोबतच अभिनेता शाहरूख खाननं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, शाहरूखनं तिला चांगला सल्ला दिला. त्यानं मला सांगितलं होतं की नेहमी अशा लोकांसोबत काम कर ज्यांच्यासोबत काम करताना तुला आनंद होतो. 






'स्वत:ला नशिबवान समजते कारण मी ब्रेस्ट इम्प्लांट केलं नाही', असं दीपिका म्हणाली. ये जवानी है दीवानी. चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यूईयर, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये दापिकानं प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा गेहराईंया हा चित्रपटा रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha