Samantha React On Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांचा घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. प्रियांका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. प्रियांका आणि  निक विभक्त होणार, अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका निकची खिल्ली उडवताना दिसत आहे. अभिनेत्री समंथा रूथ प्रभुने  (Samantha Ruth Prabhu)  प्रियांकाच्या या व्हिडीओवर दिलेल्या रिअ‍ॅक्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.  


नेटफ्लिक्सच्या  'द जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट' या शोमधील प्रियांकाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये प्रियांका निकला रोस्ट करताना दिसत आहे. प्रियांकाने आणि निकसोबत या शोमध्ये केविन आणि जो या निकच्या भावांनी देखील हजेरी लावली होती.  प्रियांकाचा हा व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर शेअर करून समंथाने त्याला  'अमेजिंग' अशी रिअ‍ॅक्शन दिली आहे. समंथाचा नुकताच  नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाला. त्यामुळे  प्रियांकाच्या या व्हिडीओला समंथाने दिलेल्या रिअ‍ॅक्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. 






नुकतेच प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी  प्रियांका आणि निक यांच्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे.  मधु चोप्राने सोशल मीडियावर लिहिले आहे,"प्रियांका चोप्रा आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे."


Pataudi Palace : 150 खोल्या, 100 नोकर; नवाब सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचा राजेशाही थाट


Taapsee Pannu : तापसीचं पहिलं प्रेम; पण या कारणामुळं झालं होतं ब्रेक-अप, शोमध्ये दिली माहिती