Shah Rukh Khan Mannat In Legal Issues: बॉलिवूडचा (Bollywood Actor) किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजे, आजही साऱ्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा आलिशान बंगला 'मन्नत' (Mannat Bungalow) तर चाहत्यांसाठी पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही. चाहते अनेकदा मन्नतच्या बाहेर शाहरुखची फक्त एक झलक पाहण्यासाठी तासन्तास गर्दी करुन उभे असतात. शाहरुख खान नाहीतर त्याच्या मन्नतबाहेर फोटो काढण्यासाठीही (Shah Rukh Khan Mannat Bungalow) चाहत्यांची नेहमीच मन्नतबाहेर गर्दी होत असते. अशातच नुकताच शाहरुख खाननं आपला मन्नत आणखी सुंदर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मन्नतचं रिनोवेशन सुरू केलं असून शाहरुखचं कुटुंब दुसरीकडे स्थायिक झालं आहे. पण, आता मन्नतचं रिनोवेशन करणं शहारुख खानला चांगलंच महागात पडणार असून तो कायदेशीर पेचात अडकला आहे. त्यामुळे शाहरुख खानला मन्नतचं रिनोवेशनचं काम तात्काळ थांबवावं लागणार आहे.
खरंतर, शाहरुख खानचं मन्नत एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. मन्नतचा ग्रेड III हेरीटेज स्ट्रक्चरच्या यादीत समावेश आहे. अशा परिस्थितीत, या बंगल्यात कोणतेही स्ट्रकचरल बदल करण्यासाठी, सुपरस्टारला अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी एनजीटीला पत्र लिहून आरोप केला आहे की, शाहरुख खान आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीनं मन्नतच्या नूतनीकरणाची परवानगी न घेऊन कोस्टल रेग्युलेशन झोन नियमांचं उल्लंघन केलं आहे.
एनजीटीनं पुरावे मागितले...
एनजीटीनं संतोष दौंडकर यांना शाहरुख खानवर लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एनजीटी या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी करणार आहे. न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या समितीनं सांगितलं की, "जर प्रकल्प प्रस्तावक किंवा एमसीझेडएमएनं कोणत्याही योग्य प्रक्रियेचं उल्लंघन केलं असेल, तर अपीलकर्त्याला चार आठवड्यांच्या आत योग्य पुराव्यांसह ते सिद्ध करावे लागतील, असं न केल्यास या न्यायाधिकरणाच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल प्रवेशाच्या टप्प्यावरच अपील फेटाळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही."
सध्या भाड्याच्या घरात राहतोय शाहरुख
दरम्यान, शाहरुख खान आपल्या सहा मजल्यांचा आलिशान बंगला मन्नतवर आणखी दोन मजले चढवण्याचा विचार करतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या शाहरुख भाड्याच्या घरात राहतोय. मे महिन्यापर्यंत शाहरुख आपल्या कुटुंबासोबत जॅकी भगनानीच्या घरात भाड्यानं राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण खान कुटुंब भाड्याच्या घरात शिफ्ट झालं आहे.