Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडमध्ये अनेकजण आपलं नशीब आजमावयाला येतात. अनेकजण या मायाजालात गुरफटतात, तर काहीजण यशाची पायरी चढतात. 1970 आणि 80 च्या दशकात बॉलिवूडवर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जीतेंद्र, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांसारख्या दिग्गज कराकारांचं वर्चस्व होतं. पण, यांचा दबदबा असतानाच एका अभिनेत्यानं इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आणि भल्याभल्या दिग्गजांसमोर आपलं आव्हान उभं केलं.
आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगत आहोत तो आज अमिताभ बच्चन किंवा धर्मेंद्र सारखा अॅक्टिवली फिल्म्समध्ये काम करत नाही. पण, त्यांचं स्टारडम तेवढंच मजबूत आहे, जेवढं पहिलं होतं. आजही त्याचे फॅन्स त्याचं कौतुक करताना थकत नाहीत.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या करिअरमध्ये कधीना कधी फ्लॉप फिल्म पाहिल्या आहेत. अनेकांनी तर सुपरस्टार टॅग मिळण्यापूर्वी जी पहिली पायरी चढली ती, अपयशानंच. 1980 आणि 90 च्या दशकातला एक सेलिब्रिटी असाही आहे, ज्यानं सलग अनेक फिल्म्समध्ये काम केलं आणि फिल्म मेकर्सची पहिली पसंती मिळवली.
सुपरस्टारचा टॅग मिळवणाऱ्या या अभिनेत्यानं 47 वर्षांच्या करिअरमध्ये 180 फ्लॉप फिल्म्स देण्याचा रेकॉर्ड केला. स्वतःची एवढी मोठी फिल्मोग्राफी असताना त्यानं स्वतःच्या 200 फिल्म्सही पाहिलेल्या नाहीत. मिथुन चक्रवर्तीच्या सुपरस्टारडमचं राज त्यांच्या फिल्मोग्राफीमध्येच दडलेलं आहे.
180 फ्लॉप फिल्म्समध्ये काम केल्यानंतर त्यांनी 50 हिट चित्रपट दिले. ज्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांनी चौथा सर्वाधिक हिट फिल्म्स देणाऱ्या अभिनेत्याचा बहुमान मिळवला. 1990 च्या दशकात त्यांनी 1993-98 दरम्यान सलग 33 अयशस्वी चित्रपटांसोबत सर्वाधिक फ्लॉप फिल्म्सचा रेकॉर्डही आपल्या नावे केला.
एका मुलाखतीत बोलताना मिथुन चक्रवर्तीनं म्हटलं होतं की, "मी 370 पेक्षा जास्त फिल्म्स केल्या आहेत. ज्यापैकी आजवर जवळपास 200 फिल्मही पाहिलेल्या नाहीत. यापैकी 150 फिल्म्सनी गोल्डन जुबली आणि डायमंड जुबलीसुद्धा पूर्ण केली. अनेक फिल्म्स दोन वर्षांपर्यंत स्क्रिनवर चालल्या. पण, त्या 200 फ्लिम्समध्ये मी पूर्ण इमानदारी आणि मेहनतीनं काम केलं."
सर्वाधिक फ्लॉप फिल्म्सचा रेकॉर्ड असूनही मिथुन चक्रवर्तीनं आपलं सुपरस्टारडम कायम ठेवलं. प्रेक्षकांमध्ये आजही त्यांची फार मोठी फॅनफॉलोइंग आहे आणि अनेकजण त्याला सुपरस्टार समजतात. मिथुन चक्रवर्ती डिस्को डान्सर, गुरू, अग्निपथ आणि प्यार झुकता नही यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जातात.
मृगया (1976) मध्ये आपल्या शानदार सुरुवातीनंतर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. ज्यामध्ये त्यांनी गहराई आणि यथार्थवादासोबत एका आदिवासी व्यक्तीची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये भारतीय सिनेमांमध्ये त्यांच्या योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :