मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे नाव फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. त्याच्याकडे आज पैसा, प्रसिद्धी असं सगळंकाही आहे. प्रत्येकाला त्याच्यासारखंच आयुष्य जगावं वाटतं. अख्खी दुनिया त्याला एकदा पाहण्यासाठी झुरते. अशी कोणतीही सुखवस्तू नाही, जी त्याला मिळू शकत नाही. पण एवढा मोठा स्टार असूनही त्याची एक इच्छा मात्र कधीच पूर्ण होऊ शकली नाही. ही इच्छा अपूर्ण राहिल्याचं दु:ख त्याल आजही आहे. ही सल त्याच्या मनात आजही सलते. 


शाहरूख खानने सांगितली आठवण


शाहरू खान त्याच्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतो. त्याचे पालक फारच लवकर त्याला सोडून गेले. मात्र आई-वडिलांच्या ज्या काही आठवणी आहेत, त्या शाहरूखने फार जपून ठेवल्या आहेत. मनाच्या कोपऱ्यात या हळव्या आठवणी शाहरुखने आजही जपून ठेवल्या आहेत. दरम्यान, शाहरुखने त्याची अशीच एक आठवण सांगितली आहे. ही आठवण ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. 


ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही


एका कार्यक्रमात शाहरुख खान आणि मेगा स्टार अमिताभ बच्चन एकत्र आले होते. यावेळी शाहरुख खानने त्याच्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी बोलताना त्याने त्याच्या वडिलांनी नेमकं काय सांगितलं होतं, याची माहिती दिली. "माझी ही स्टोरी फारच सिरियस स्टोरी आहे. माझे-आईवडील हे पेशावरचे होते. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की जगातल्या तीन गोष्टी जरूर पाहा. मी या जगात असेल किंवा नसेन तू मात्र या तीन गोष्टी जरूर पाहा. दुर्दैवाने या तिन्ही गोष्टी ते हयात असताना होऊ शकल्या नाही. त्यांनी सांगितलं की एकदा इस्तानबूल जरूर पाहा. त्यानंतर इटली म्हणजेच रोमदेखील जरूर पाहा. तिसरं म्हणजे काश्मीर आहे, ते पण पाहा. इटली किंवा इस्तानबूल माझ्याशिवाय पाहा हरकत नाही. पण कश्मीर मात्र माझ्याशिवाय पाहू नको, असं मला माझे वडील म्हणाले होते. मात्र माझ्या वडिलांचे फारच लवकर निधन झाले," असे शाहरुख अमिताभ यांना सांगितले. 


शाहरुखच्या मनात बोचतेय सल 


तसेच, माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मला काश्मीरमध्ये जाण्याच्या अनेक संधी आल्या. मला माझे मित्र बोलवायचे. घरचेही सुट्टी साजरी करण्यासाठी काश्मीरमध्ये गेले. पण मी मात्र कधीच काश्मीरला गेलो नाही. कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की काश्मीर माझ्याशिवाय पाहू नकोस, अशी भावनिक आठवण शाहरुखने अमिताभ बच्चन यांना सांगितली. दरम्यान हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण या व्हिडीओच्या माध्यमातून शाहरुखच्या मनाचा हळवा कोपरा समोर आला आहे. त्याचे फॅन हा व्हिडीओ पाहून शाहरुखविषयी हळहळ व्यक्त करत आहेत.    


हेही वाचा :


Suraj Chavan Meet Ajit Pawar : दादा देवमाणूस, माझं घर 9 महिन्यांत बांधून देण्याचं आश्वासन; सुरज चव्हाण अजित पवारांविषयी भरभरुन बोलला


बाॅलिवूडची धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दिक्षितचं नवं फोटोशूट; लिंबू कलरच्या साडीत दिसतेय खास!


Ankita Lokhande : लग्नासाठी परफेक्ट अभिनेत्री अंकिता लोखंडे हा नवा लूक; पाहा फोटो!