Suraj Chavan Ajit Pawar Meet : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी (Bigg Boss Marathi 5 Winner) बारमतीचा रांगडा गडी झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) उंचावली. अवघ्या महाराष्ट्रानं सूरजवर भरभरुन प्रेम केलं आणि त्याला बिग बॉसच्या पर्वाचा विजेता केलं. त्यानंतर सूरज संपूरण राज्यात चर्चेत होता. आपल्याच मतदारसंघातल्या सूरजनं नाव कमावल्याची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचली आणि अजित पवारांनी सूरजची भेट घेतली. त्यावेळ सूरजला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं होतं. अशातच आता बिग बॉस फेम सूरज चव्हाणनं मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी पुढच्या 9 महिन्यांत सूरजचं घर पूर्ण होईल, असं आश्वासन अजित पवारांनी त्याला दिल्याची माहिती मिळत आहे.
सूरजनं मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या घराची देखील अपडेट घेतली. पुढील 9 महिन्यात सूरज यांच घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी अभिनेता सूरज चव्हाणला दिलं. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सूरज चव्हाणनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, "अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..." पुढे बोलताना सूरज म्हणाला की, अजितदादांना माझ्याकडून खूपखूप शुभेच्छा... मी त्यांना भेटण्यासाठी आलो. मलाच भेटायचं होतं दादांना. कधी एकदा दादांची भेट घेतोय असं झालं होतं. माझ्या घराचं काम सध्या सुरू आहे. अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..."
"दादांचा शब्द आहे, पूर्ण तर करणारच आणि होणारच... आज अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझी अनेक मोठी कामं सुरू आहेत. आता झापुक झूपुक पिक्चर लवकरच तुम्हालाटीव्हीवर दिसेल.", असंही सूरज चव्हाण म्हणाला.
सूरजचं घर कधी बांधून पूर्ण होणार?
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, सध्या सूरजच्या घराचं काम सुरू आहे. पुढच्या 9 महिन्यांत त्याच्या घराचं काम पूर्ण होण्याचं आश्वासन अजित पवारांनी त्याला दिलं आहे. सूरज चव्हाण हा बारामतीतील मोढवे गावचा रहिवासी आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी रील स्टार आणि गायक होता. सूरज घर बांधून त्याला 'बिग बॉस'चं नाव देणार आहे. सूरजच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
'झापुक झुपुक' सूरजचा आगामी चित्रपट
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपुक' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. स्वतः सूरजनं यासंदर्भात माहिती दिली. सूरज चव्हाणनं अजितदादांची भेट घेतली. त्यावेळी त्यानं माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा सूरज म्हणाला की, 'झापुक झुपुक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर केदार शिंदेंनी त्याला घेऊन 'झापुक झुपुक' सिनेमा काढणार अशी घोषणा केली होती. तोच सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती सूरज चव्हाणनं दिली आहे.
पाहा व्हिडीओ : "दादांचा शब्द आहे, पू्र्म तर करणारच आणि होणारच..." : सूरज चव्हाण