Sayali Sanjeev : 'आज बरोबर सहा महिने झाले त्यांना जाऊन...'; सायली संजीवची भावनिक पोस्ट

सायली संजीवनं (Sayali Sanjeev) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Continues below advertisement

Sayali Sanjeev : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीवचा (Sayali Sanjeev) चाहता वर्ग मोठा आहे. सहा महिन्यांपूर्वी सायलीच्या वडिलांचे निधन झाले. नुकतीच सायलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Continues below advertisement

सायलीची पोस्ट 
सायलीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून त्यांनी वापरलेल्या अंगठीची मी ही अंगठी माझ्यासाठी करून घेतली. आज बरोबर सहा महिने झाले त्यांना जाऊन. आय लव्ह यू बाबा...' सायलीनं या पोस्टबरोबरच एका अंगठीचा फोटो शेअर केला आहे. या अंगठीवर संजीव असं लिहिलेलं दिसत आहे.

सायलीनं तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिनं लिहिले होते,"26/07/1958 - 30/11/2021 तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं"

सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' सिनेमाचे सिनेसृष्टीसह प्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत. सायलीची 'यू टर्न' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदेची या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका होती. 'झिम्मा' चित्रपटामधील सायलीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

हेही वाचा :

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola