Bollywood Celebrity : फोटोत चेहरा बनवणारी ही मुलगी शेरो शायरीची आहे शौकीन, ओळखलंत का या बॉलिवूड ब्युटीला?

Bollywood Celebrity : सोशल मिडीयावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Continues below advertisement

Bollywood Celebrity : सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे (Childhood Photo) फोटो बरेच व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्साही असतात. लाडक्या स्टार्सच्या प्रेमापोटी चाहते त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करतात. असाच एक फोटो सध्या सोशल मिडीयावर बराच व्हायरल होतो आहे. 

Continues below advertisement



 

तर, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारा अली खान आहे. छोट्या छोट्या आनंदात मोकळेपणाने जगणारी सारा अली खानला शेरो शायरीही खूप आवडते. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर नमस्ते प्रेक्षक सत्र आणून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करते. आज सारा अली खानचा हा फोटो व्हायरल झाला आहे. 

मिस सारा अली खान चित्रपटांमध्ये तिच्या खेळकर अभिनयाने आणि अप्रतिम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. केदारनाथ या पहिल्याच चित्रपटातून सर्वांना वेड लावणाऱ्या साराने मोठ्या कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. साराला तिच्या आईची अमृता सिंगची (Amruta Singh) हुबेहूब कॉपी म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. खरंतर, साराला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. पतौडी घराण्याची ही लाडकी मुलगी बालपणापासूनच फिल्मइंडस्ट्रिशी निगडीत आहे. ती सर्वांचीच लाडकी आहे. लहानपणी सारा तिच्या वडिलांबरोबर सैफ अली खानबरोबर (Saif Ali Khan) अनेकदा शूटवरही गेली आहे. 

लवकरच विकी कौशलसोबत झळकणार

सारा नुकतीच धनुष आणि अक्षय कुमारसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकली होती. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही खूप आवडला. सारा अली खान सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर 'लुका छुप्पी'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola