Sara Ali Khan : ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच साराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारानं एक बॅग हातात घेतली आहे, असं दिसत आहे. या बॅगमुळे सध्या अनेक जण साराला ट्रोल करत आहेत.
सारा ही जिममध्ये वर्क-आऊट सेशनला जात होती. त्यावेळी फोटोग्राफर्सनं तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. या व्हिडीओमध्ये साराच्या हातात एक बॅग दिसत आहे. या बॅग वर साराचं नाव लिहिलेलं दिसत आहे. या बॅगमुळे सध्या अनेक नेटकरी साराला ट्रोल करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स एका नेटकऱ्यानं साराच्या बॅगला ट्रोल करत कमेंट केली, 'आम्ही अशा बॅगमध्ये भाजी आणतो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'रिकामी बॅग दाखवून ती फक्त शो ऑफ करत आहे.' 'रिकामी बॅग घेऊन का फिरत आहेस?' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.
हेही वाचा: