Koffee With Karan 7 : सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Kofee With Karan) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिसणार आहेत. 7 जुलैला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सारा अली खान आणि जान्हवी कपूर 'कॉफी विथ करण'च्या (Koffee With Karan) पहिल्या भागात दिसणार आहेत. या कार्यक्रमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आहे. समंथा रुथ प्रभू या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या बातम्या पसरल्या जात होत्या. पण आता समंथासोबत अक्षय कुमारदेखील या कार्यक्रमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 


वरुण धवन, अनिल कपूर आणि आलियादेखील होणार सहभागी


सारा-जान्हवी, समंथा-अक्षय व्यतिरिक्त वरुण धवन आणि अनिल कपूरदेखील 'जुग जुग जियो' या सिनेमातील सहकलाकांसह 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरदेखील 'कॉफी विथ करण'च्या मंचावर येणार आहेत. आलिया-रणबीरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रीमियर


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा प्रीमियर 7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट


Koffee with Karan : आलिया-रणबीर दिसणार 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये, लवकरच शूटिंगला होणार सुरुवात