Sapna Choudhary superhit haryanvi song video : कधीकाळी हरियाणाची डान्सर सपना चौधरी ही भारतातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. तिचे हावभाव आणि अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात पडायचे. अजूनही तिची क्रेझ कमी झालेली नाही. त्यामुळेच तिची गाणी रिलीज होताच धुमाकूळ घालतात. सपना चौधरी तिच्या डान्स स्टाईलसाठीही खूप लोकप्रिय आहे. सध्या तिचं एक सुपरहिट गाणं यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे, ज्याचं नाव आहे "Jale 2"... या गाण्याला आतापर्यंत 53 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Continues below advertisement


व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की, सपना चौधरी हरियाणवी लुकमध्ये पाहायला मिळते. या गाण्यामध्ये तिचा रोमँटिक डान्स पाहायला मिळतोय . या गाण्यात सपना चौधरीसोबत अमन जाजीही दिसत आहेत, ज्यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरी अप्रतिम नृत्य करताना दिसते आणि तिच्या कातिल अदांनी ती चाहत्यांची मनं जिंकते. या गाण्याचे बोल मुकेश जाजी यांनी लिहिले आहेत, दिग्दर्शन साहिल संधू यांनी केलं आहे आणि निर्मिती दीपेश रखेजा यांची आहे.




सपना (Sapna) चा जन्म हरियाण्यातील रोहतक जिल्ह्यातल्या नजफगड या गावात 25 सप्टेंबर 1990 रोजी झाला. तिने रोहतक येथूनच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तिची वडील त्या काळी एका खासगी कंपनीत काम करत होते. कैथलच्या पुंडरी येथे सपनाने आपला पहिला कार्यक्रम केला होता, पण त्याबदल्यात तिला काहीच मिळाले नव्हते. त्यानंतर तिला 3100 रुपये मिळाले. त्या काळात सपना दरमहा 30 ते 35 कार्यक्रम करत असे आणि त्यावरच घरचा खर्च चालत असे. आता सपना एका कार्यक्रमासाठी लाखो रुपये घेते. सपनाला तिच्या पहिल्याच गाण्याने मोठी लोकप्रियता मिळाली.


सपना इतकी लोकप्रिय झाली की लोक तिची एक झलक पाहण्यासाठीही उतावळे राहू लागले. मात्र, त्याच काळात एका कार्यक्रमात सपनाने एक रागणी गायली आणि त्यातून वाद निर्माण झाला. सपनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि एसआयटीही गठित झाली. फेसबुकवर सपनाविषयी खूप काही लिहिले गेले, जे तिला सहन झाले नाही आणि तिने विष प्राशन केले. तरीही सपना वाचली, पण तिला बराच काळ आयसीयूमध्ये राहावे लागले. या प्रसंगातून मात्र तिला मोठा फायदा झाला, कारण ती अजून जास्त लोकप्रिय झाली आणि थेट सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 11’ मध्ये पोहोचली.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


'पाव्हणं नाद करायचा नाही', तरुणीचा आक्षेपार्ह डान्स व्हिडीओ नेमका कुठला? आणि कधीचा? सत्य समोर


Upcoming Marathi Movie Tango Malhar: शास्त्रज्ञ, उद्योजिकेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; प्रेरणादायी 'टँगो मल्हार'चं 19 सप्टेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शन