Rayat Shikshan Sanstha Baramati girl objectionable dance video : सध्याच्या काळात सोशल मीडियावर कोण कसं व्हायरल होईल सांगता येत नाही. व्हायरल व्हिडीओवरुन अनेकांमध्ये सेलिब्रिटी व्हायची स्पर्धा सुरु झालीये. नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे असेच काही व्हिडीओ व्हायरल झाले आणि त्यानंतर ती महाराष्ट्रातील सेलिब्रिटी झाली. दरम्यान, आता आणखी एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना आहे. या कार्यक्रमाचं आयोजन भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने मार्च महिन्यात करण्यात आलं होतं. दरम्यान, जत्रेतील डान्स कार्यक्रम हा शाळेच्या मैदानावर पार पडला होता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. शिवाय शाळेच्या परिसरात अशा प्रकारचे डान्स व्हिडीओ कशामुळे आयोजित केले जातात? असा सवालही नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.
दहिहंडी उत्सवातही डान्स कार्यक्रम
दरम्यान, यंदाच्या दहिहंडी उत्सवात अनेकांनी तरुणींच्या डान्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नृत्यांगणा गौतमी पाटील हिने मागाठाणे येथील दहिहंडी उत्सवात स्टेज दणाणून सोडला होता. यावेळी अगदी तिच्या लूकची देखील चर्चा रंगली होती. अनेक मंडळांनी डान्स कार्यक्रम आयोजित केल्यानं नेटकऱ्यांनी देखील आक्षेप घेतला होता. दहिहंडी उत्सवात डान्स कार्यक्रम आयोजित करणे, योग्य नसल्याचं मत सोशल मीडियावरुन नेटकरी व्यक्त करत होते. दरम्यान, दहिहंडी उत्सवानंतर बारामतीतील हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अश्लील असल्याचंही म्हटलंय. दरम्यान, शाळेच्या परिसरात अशा प्रकारचे डान्स कार्यक्रम आयोजित केले जाऊ नयेत, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, हा डान्स कार्यक्रम शाळेकडून आयोजित केलेला नसून तो एका जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आल्याची समोर आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
