Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने नुकतच गडकरी रंगायतन येथे झालेल्या 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कार्यक्रमात एक कविता सादर केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता सामन्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच भावली. याचं एक मत वाया गेलं, अशी ही संकर्षणची कविता आहे. या कवितेला संकर्षणला सध्या महाराष्ट्रभरातून भरभरुन प्रतिसाद दिला जातोय. इतकच नव्हे तर त्याला शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनही या कवितेसाठी फोन गेला. 


लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. देशाची सत्ता आता कोणाच्या हातात जाणार, हे अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण त्याआधी संकर्षणने महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य हे सगळ्यांनाच भावलं. यावर सकर्षणने एबीपी माझासोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याला आलेल्या प्रतिक्रियांविषयी भाष्य केलं आहे. 


उद्धव ठाकरेंनी खळखळून हसत दिली दाद


संकर्षणची कविता एकून उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करुन त्याला दाद दिली. उद्धव ठाकरे काय म्हणाले यावर संकर्षणने म्हटलं की, सकाळी साडेनऊ वाजता मला त्यांचा फोन आला. त्याआधी मी अस्वस्थ होऊन घरामध्ये फिरत होतो. त्यांचा फोन आला आणि ते स्वत: म्हणाले की नमस्कार, जय महाराष्ट्र मी उद्धव ठाकरे बोलतोय. त्यांनी मला मिश्लिक टीप्पणी करत म्हटलं, की तुम्ही आमच्या सुनेचं अस्मितेचं एक मत वाया घालवलत. फार उत्कृष्ट आणि फार सुंदर झालीये. मी त्यांना त्यावर प्रश्न विचारला तुम्ही रागावलात तर नाही ना? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, अजिबात नाही, आजच्या काळात असं खरंखरं लिहिणारं कुणीतरी हवंच की, ज्यांनी खरं काहीतरी बोलावं आणि ते आमच्यापर्यंत पोहचावं. आमच्याही चुका आम्हाला कळतील. पुढे ते म्हणाले की, इथून पुढेही असंच छान छान लिहित जा, जेणेकरुन तुमच्यामध्ये काय चालू आहे हे आम्हाला कळेल आणि आमच्यापर्यंत ते पोहचेल. 


शरद पवारांनी मला भेटायला बोलावलं - संकर्षण कऱ्हाडे


तुला यावर अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या,तेव्हा काय वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना संकर्षण म्हणाला की,गेल्या दोन दिवसांत माझा फोन खूपच श्रीमंत झालाय. त्याचवेळी मला हेही कळलंय की ही मोठी माणसं खरंच किती मोठी असतात. आपण खाली खूप विचार करुन हेवेदावे करुन चिखल करुन घेतो. मला अनेक मोठ्या व्यक्तींचे फोन आले. शरद पवार माझ्याशी स्वत: नाही बोलले. पण त्यांचे एक निकटवर्तीय, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की, मी तुमच्या कविता नेहमी साहेबांना ऐकवतो. त्यांना ही पण पाठवली. त्यांना खूप आवडली. हे राजकारण, निवडणुकांचे एकदा झालं की, तुम्ही त्यांना भेटायला या. एक तासभर तुमच्या सगळ्या कविता ऐकवा. 



ही बातमी वाचा : 


Sankarshan Karhade : 'पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात, हाच माझा पक्ष...' लोकसभेच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर संकर्षणची कविता