मुंबई : संजय लीला भन्साळी सध्या गंगूबाई काठियावाडी या सिनेमाच्या पूर्णत्वाकडे लक्ष लावून आहेत हे खरं. पण ते चालू असतानाच त्यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव सुरू गेली आहे. हा सिनेमा असणार आहे बैजू  बावरा. या सिनेमातला बैजू ठरला आहे.


संजय लीला भन्साळी आता या सिनेमातल्या मुख्य व्यक्तिरेखेसाठी रणबीर कपूरला घेणार आहेत. या सिनेमासाठी भन्साळी रणबीर आणि दीपिकाला पुन्हा एकदा पडद्यावर आणणार असल्याची चर्चा होती. पण सध्या दीपिकाची चर्चा थांबली असून, यात रणबीर बैजूची भूमिका करणार हे नक्की झाल्याची बातमी आहे. या सिनेमात दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. एक आहे, बैजू आणि दुसरी आहे तानसेन. पैकी बैजू रणबीर साकारणार आहे. तर तानसेनची भूमिका कोण करणार हे मात्र अद्याप अनिश्चित आहे.


बैजू बावरा हा सिनेमा सगळ्यात आधी आला तो 1952 मध्ये. त्यावेळी हा सिनेमा तब्बल 100 आठवडे चालला. म्हणजे दोन वर्ष. या चित्रपटाचं संगीत तुफान गाजलं. याचं संगीत दिलं होतं नौशाद यांनी. या चित्रपटात भारत भूषण यांनी बैजू साकारला होता. तर बैजूची प्रेमिका साकारली होती मीना कुमारी यांनी. या चित्रपटात तानसेन झाले होते सुरेंद्र.


संजय लीला भन्साळी आणि रणबीर हे जवळपास 13 वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी सावरिया या सिनेमासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं.