Sanjay Kapoor : कपूरांचं घराणं ही बॉलीवूडमधील सर्वात नावाजलेलं आणि फेमस आहे. बोनी कपूर (Boney Kapoor), अनिल कपूर (Anil Kapoor), संजय कपूर (Sanjay Kapoor) ही कपूर मंडळीही बॉलीवूडमधील दिग्गज मंडळी आहे. अनेकदा सोशल मीडियावर या संपूर्ण कपूर कुटुंबाचा एकत्र फोटो देखील पाहायला मिळतो. त्यामुळे या भावंडांमध्ये बरचं प्रेम असल्याचं दिसतं. ही तिन्ही भावंडं त्यांची मुलं अनेकदा एकत्र असतात. मज्जा करतात, सुट्ट्या एकत्र घालवतात. पण एकाच क्षेत्रात असल्याने या तिन्ही भावंडांची एकमेकांशी तुलना देखील केली जाते. त्यावर नुकतच अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरने भाष्य केलं आहे. 


पण संजयच्या या उत्तराने या भावांडच्या नात्यावरही अनेकांना प्रश्न पडलेत. नुकतच संजय कपूरच्या पत्नीची देखील एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पुन्हा एकदा संजय कपूर भावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. 


संजयने नेमकं काय म्हटलं?


संजय कपूरने नुकतच अ मिलेनियल माईंड पॉडकास्ट या चॅनलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने अशा कुटुंबात मला जन्म दिल्याने पालकांचे आभार मानले होते. संजयने म्हटलं की, आम्ही सगळे एकत्र राहायचो.मग कुटुंब वाढलं, त्यानंतर सगळे आपल्या आपल्या हिशोबाप्रमाणे राहायला लागले. मी असं नाही म्हणत की स्पर्धा नाहीये. पण ही त्या दोन व्यक्तींमधली गोष्ट आहे. मला असं नेहमी वाटतं की, अनिल जरी माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असेल तरीही मी प्रत्येक बाबतीत त्याच्यापेक्षा जास्त नशिबवान आणि समाधानी आहे. मी जरी त्याच्यापेक्षा कमी गोष्टी मिळवल्या असतील, तरी मी त्याच्यापेक्षा जास्त खुश आहे. याचा अर्थ असा नाही की, त्याच्या आयुष्यात खूप दु:ख आहे. मला हे योग्य शब्दांत मांडता येत नाहीये, पण मी त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आनंदी आहे. 


मी त्यांना दीड-दोन महिने भेटतच नाही - संजय कपूर


मी सगळे एकत्र रहायचो. सुरुवातीला आमचा दोन बेडरुम हॉल किचनचं घर होतं. त्यावेळी आमचं कुटुंबही तितकचं जवळ होतं. त्यानंतर आमची कुटुंब वाढ गेली, मुलं झाली. असं अनेकदा झालं आहे की मी अनिल आणि बोनीला महिना-दीढ महिना भेटलोच नाही. पण म्हणून कधी आमच्यातलं प्रेम कमी झालं नाही. आम्ही तितकचं प्रेम करतो. 


ही बातमी वाचा : 


Manoj Bajpayee : जगाचा निरोप घेण्यापूर्वी सुशांतचा इंडस्ट्रीत कोणासोबत झाला होता शेवटचा संवाद? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला, 'त्याच्याजागी कुणीही असतं तरी...'