Sanjay Dutt Khalnayak Returns Teaser: 1993 साली रिलीज झालेला खलनायक हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातून संजय दत्तने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडली.  संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. दरम्यान, आता 33 वर्षांनंतर 'खलनायक' पुन्हा एकदा कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे  'खलनायक रिटर्न्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक वर्षांनंतर संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत परतला आहे.   सिनेमाचा फर्स्ट लूक जाहीर करणारा  व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे.

Continues below advertisement

संजय दत्तचा 'खलनायक रिटर्न्स' चा फर्स्ट लूक रिलीज  (Sanjay Dutt Khalnayak Returns Teaser Goes Viral)

'खलनायक'चा फर्स्ट लूकचा व्हिडीओ प्रचंड खतरनाक आहे. पहिलाच सीन थरारक आहे. रक्तपात, धुमसणारी आग,  सगळीकडे मृतदेह पडले आहेत. त्यानंतर संजय दत्त रक्ताने माखलेल्या एका माणसासमोर बसतो. संजय दत्तच्या चेहऱ्यावर जखमा आहेत.  वाढलेले केस पाहून  आपल्याला संजय दत्तचा जुना लूक आठवतो.  त्याच्यासमोर पडलेला माणूस प्राणाची भीक मागतो. संजय म्हणतो, 'मी बोललो होतो ना,   रात्री 10 वाजता बल्लू जेलमधून फुररररर...नायक नहीं खलनायक हूं मैं..' संजय दत्तचा स्वॅग दमदार आहे.  त्याचा किलर लूक  जबरदस्त आहे.

संजय दत्तने या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.  'काही कथा कधीच संपत नाही...त्या पुन्हा सुरू होतात...खलनायक रिटर्न्स..'. असं त्यानं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. संजय दत्त व्यतिरिक्त या सिनेमात कोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  चाहत्यांना संजय दत्तच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रचंड  आवडला आहे. 'खऱ्या लेजेंडचं कमबॅक', असं  एकाने टीझरच्या कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.   'माझा बालपणीचा आवडता खलनायक बल्लू बलराम, परत आला आहे', असं एकाने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

Continues below advertisement

त्या काळात 'खलनायक' सुपरहिट ठरला (Khalnayak 1993 Film)

 

सुभाष घई दिग्दर्शित 'खलनायक' हा सिनेमा 1993 साली प्रदर्शित झाला होता. संजय दत्त व्यतिरिक्त या सिनेमात माधुरी दीक्षित, अनुपम खेर,  जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.   हा  चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला. आजही या सिनेमातील गाणी तितकीच फेमस आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'हिचं राकेशसोबत...' बिग बॉसच्या घरात राखीकडून गंभीर आरोप, अखेर दिपालीने सोडलं मौन, म्हणाली...