Dipali Sayyad Reacts to Rakhi Sawants Allegations: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi Season 6) प्रचंड गाजला.  हा पर्व संपला. परंतु, अजूनही या सिझनमधील स्पर्धकांची चर्चा होत आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची विनर तन्वी कोलते ठरली.  शेवटी टॉप 3 स्पर्धकांमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या राखी सावंतने धुमाकूळ घातला होता. राखीला राकेशबाबतीत एक सॉफ्ट कॉर्नर होता. दिपाली आणि राकेशमध्ये चांगली मैत्री होती. परंतु, ही मैत्री राखीला खटकायची.  राखी आणि दिपालीमध्ये बऱ्याचवेळा वाद व्हायचे. दिपाली सय्यद ही टॉप 5 स्पर्धक ठरली. दरम्यान, ती टॉप 3 मध्ये एन्ट्री घेऊ शकली नाही. दिपाली एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या घराबाहेर येताच तिनं राखीसोबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

दिपालीला राखी नेमकं काय म्हणाली? (Dipali Sayyad reaction on Rakhi Sawant)

राकेशसोबत असलेल्या मैत्रीवरुन राखीने दिपालीला खूप काही बोलली होती.  बिग बॉसच्या घरात राखीने दिपालीवर गंभीर आरोप केले होते. 'लग्न झालंय तरी तू हे करते आहेस,  राकेश बरोबर काय चाललंय, अफेअर करते? तुझ्या मनात चांगले विचार नाही', असं राखी दिपालीला म्हणाली होती. या गंभीर आरोपांनंतर राखी आणि दिपालीमध्ये भांडण झालं होतं. 

राखीबद्दल दिपाली नेमकं काय म्हणाली? (Dipali Sayyad interview after eviction Bigg Boss Marathi 6)

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिपालीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  राखीबाबत दिपाली म्हणते, 'बिग बॉसच्या घरातच मी राखीला पहिल्यांदा भेटले होते. ती माझ्या पतीला ओळखते. सगळं  माहित असूनही एखाद्याला गेमसाठी डिवचणं, हे काही मला योग्य वाटलं नव्हतं.  बिग बॉसच्या घरात आपण सगळ्यांशी चांगलं बोलून - चालून राहिलो. चांगली मैत्री केली. पण तिला माझं राकेशसोबतचं बॉण्डिंग खटकलं'.

Continues below advertisement

'तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या,  बिग बॉसच्या घरात ती मला खूप काही बोलली आहे.  पण काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाही. काही गोष्टी कट करण्यात आल्या.  माझ्या पण तोंडातून एक शब्द निघाला होता. मी माफीही मागितली होती. खरंतर राखीबद्दल माझं काहीच म्हणणं नाही', असं दिपालीने स्पष्ट केलं. '27 वर्षांचा संसार टिकवणं कोणत्याही स्त्रीला सोपं नाही.  एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं गरजेचं आहे', असंही दिपाली म्हणाली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, चित्रपट अन् 17हून अधिक मालिकांमध्ये काम