Sangee Upcoming Movie Trailer Released: अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत 'संगी' या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टिझरनं आधी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होतीच आणि आता ट्रेलरमधून चित्रपटाचा मनोरंजक प्रवास अधिकच समोर आला आहे. हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा अफाट डोस, यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.   


'संगी'ची कथा तीन मित्रांभोवती फिरताना दिसत असून या तिघांच्या आयुष्यातील बालपणापासूनचे गमतीशीर, आनंददायी क्षण यात हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, पैसे  आणि त्यातून येणारे रंजक वळण दिसत आहे. आता ही मैत्री आणि पैसे हे नेमकं काय प्रकरण आहे? याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. 'संगी' हा चित्रपट 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.                                         


चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणतात की," 'संगी' हा चित्रपट मित्रांच्या फक्त गंमतीजंमतींचीच गोष्ट नाही तर मैत्रीची खरी खोली उलगडणारी कथा आहे. हलक्याफुलक्या विनोदांमधूनच आम्ही प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी कथा सादर केली आहे. तीन मित्रांची ही कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल, याची मला खात्री असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा."


पाहा ट्रेलर :



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'बिग बॉस' फेम अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचा हटके उखाणा, म्हणतो, "वालावलकरांची पोरगी पटवली..."; केळवणाचा VIDEO चर्चेत