Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे समीर चौघुले प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. विनोदाचं परफेक्ट टायमिंग,विनोदी भूमिकांचं आव्हान अशा सगळ्या गोष्टी सांभाळत मराठी सिनेसृष्टीत त्यांनी त्यांची विनोदी अभिनेता म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. हास्यजत्रेमधील त्यांचं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतं. त्यातच आता समीर चौघुले (Samir Choughule) त्यांच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची आणखी एक पर्वणी घेऊन येणार आहेत. 


समीर चौघुले यांनी त्यांच्या फेसबुकवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. समीर चौघुले हे दीड तासाचा एकपात्री कार्यक्रम घेऊन येत आहेत. सम्या सम्या मैफीलीत माझ्या असं या कार्यक्रमाचं नाव असणार आहे. यामध्ये धम्माल किस्से, गप्पा मनोरंजन असं सगळं या कार्यक्रमात असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची प्रेक्षकांनाही बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. 


समीर चौघुलेंची पोस्ट नेमकी काय?


समीर चौघुलेंनी त्यांच्या फेसबुकवरुन पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” ...समीर चौघुले ” …….प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते.. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं....तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”...  लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”...काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” .....वगैरे वगैरे.... ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वगवेगळ्या व्याख्या आहेत.... रसिक हो...यातली  नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल?...चला जाणून घेऊया.... आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्य कल्लोळ उसळवणाऱ्या     महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले..एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम घेऊन “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”.........हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं........  “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”....सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे...



ही बातमी वाचा : 


Digpal Lanjekar : छत्रपतींच्या इतिहासानंतर आता संतांची गाथा सांगणार, दिग्पाल लांजेरकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला