Sameer Paranjpe : अभिनेता समीर परांजपेसाठी (Sameer Paranjpe) दिग्दर्शक चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) यांनी खास पोस्ट केली असल्याचं पाहायला मिळतंय. समीरच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी पोस्ट केली होती. राजकीय पक्षांच्या चिन्हांवरुन चंद्रकांत कणसेंनी शुभेच्छांचा वर्षावर केलाय. कारण राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या प्रक्रियेच्या दिवशी समीरचा वाढदिवस होता. 


अभिनेता समीर परांजपे हा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेसोबत तो या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चंद्रकांत कणसेंनी दिलेल्या शुभेच्छांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीरला शुभेच्छा देताना चंद्रकांत कणसेंनी म्हटलं की, भाजपाकडून कमळाच्या सुवासिक, शिवसेनेकडून धनुष्यबाणा सारख्याध्येयाचा निशाणा बरोबर साधण्याच्या,मनसेकडू आगगाडी सारख्या वेगवान पुढे जाण्याच्या,उबाठाकडून मशाली सारख्या ज्वलंत विचारांच्या, राष्ट्रवादीकडून घड्याळासारख्या नेहमी वेळ पाळण्याच्या शुभेच्छा असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


लाज लज्जा सोडून... - चंद्रकांत कणसे


चंद्रकांत कणसे यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, टेलिव्हिजनच्या  दुनियेत फक्त डायलॉग बोलून पर डे भरणारे अनेक नट जन्माला आलेत... त्यांना इंडस्ट्रीत कामं ही भरपूर मिळतायत.. कारण हल्ली क्वॉलिटी नाही तर quantity फार महत्वाची झालीय...अशा ह्या नॉन अक्टर्सना सोडून काही जण आहेत, ज्यांना खरंच अभिनय कळतो... अभिनयाची जाण असते, तो जमतो आणि जमत नसेल तर खूप सारे प्रयत्न करुन लाज लज्जा सोडून, कोणाचीही तमा न बाळगता... ती लोकं अभिनयाला हरवून त्याला आपलंस करुन घेतात.. 


पुढे त्यांनी म्हटलं की, सेटवर आल्यापासून पॅकअप होईपर्यंत त्याच एनर्जीने काम करताना अजिबात कसलीच तक्रार नाही की वेळचं भान नाही..सगळ्या सहकलाकारांबरोबर मज्जा मस्ती करत ( विशेतः— आभा आणि दिनेश) कोणाबरोबर कसलेच हेवेदावे न ठेवता सेटचं वातावरण हलकं करून उत्तम काम करणारा आमचा समीर, आणि त्याचा आज वाढदिवस...नेमका मतदानाच्या दिवशी...समीर तुला  भाजपाकडून कमळाच्या सुवासिक, शिवसेनेकडून धनुष्यबाणा सारख्याध्येयाचा निशाणा बरोबर साधण्याच्या,मनसेकडू आगगाडी सारख्या वेगवान पुढे जाण्याच्या,उबाठाकडून मशाली सारख्या ज्वलंत विचारांच्या, राष्ट्रवादीकडून घड्याळासारख्या नेहमी वेळ पाळण्याच्या शुभेच्छा असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 






ही बातमी वाचा : 


Reshma Shinde : जीवनात ही घडी अशीच राहू दे...! मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, केळवणाचे फोटो आले समोर